• Download App
    शाळेत शिकविल्याप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरू, रावसाहेब दानवे यांनी केले राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन|As taught in school, as far as we know, Samarth Ramdas, Shivaraya's mentor, Raosaheb Danve, supported the Governor's statement.

    शाळेत शिकविल्याप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरू, रावसाहेब दानवे यांनी केले राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद: शाळेत शिकविल्याप्रमाणे तसंच आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरु होते, असे विधान करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यपालांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.As taught in school, as far as we know, Samarth Ramdas, Shivaraya’s mentor, Raosaheb Danve, supported the Governor’s statement.

    औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरु होते. जेवढं आम्ही शिकलो, जेवढं आम्ही वाचलं, जेवढं आम्ही ऐकलं त्याचा आधार घेऊन बोलतोय. आमच्यापेक्षा अधिक वाचणारं कुणी असेल किंवा त्यांच्या वडिलांना, जाणकारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर तो त्यांचा भाग आहे.



    पण आमची माहिती अशीच आहे की, रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते. हे आमचं मत आहे, त्यामुळे मत मांडायला आम्ही कुणाला नाही म्हणत नाही. मी माझं मत मांडलं, त्यांनी त्यांचं मत मांडलं, त्यामुळे टीका करण्याचं काय कारण आहे.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात आंदेलन झाले होते. कोश्यारी म्हणाले होते की, आपल्या देशात गुरुची उज्वल परंपरा असून, ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते?. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे.

    As taught in school, as far as we know, Samarth Ramdas, Shivaraya’s mentor, Raosaheb Danve, supported the Governor’s statement.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस