• Download App
    ईडीचा दणका बसताच संजय राऊतांना आठवले महात्मा गांधी आणि हरेन पांड्या!! As soon as the ED hit, Sanjay Raut remembered Mahatma Gandhi and Haren Pandya

    Sanjay Raut ED Action : ईडीचा दणका बसताच संजय राऊतांना आठवले महात्मा गांधी आणि हरेन पांड्या!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडीने संपत्ती जप्त करतात संजय राऊत यांना नवी दिल्लीतल्या आपल्या घरातून माध्यमांशी बोलताना राऊत यांना महात्मा गांधी आठवले. एवढेच नाही, तर त्यांना गुजरात भाजपचे नेते आणि गुजरातचे गृहराज्यमंत्री हरेन पंड्या हे देखील आठवले…!! As soon as the ED hit, Sanjay Raut remembered Mahatma Gandhi and Haren Pandya

    संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबाग येथील ८ भूखंड आणि दादर येथील फ्लॅटची केली आहे. १ हजार १०४ चौ. मीटर भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.



    गांधीजी पुन्हा मरण पावले

    यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, माझे सगळे कुटुंब ज्या दादरच्या घरात राहते, ते घर जप्त केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा किती बेकायदेशीरपणे काम करत आहेत, हे यावरून दिसते. माझे सगळे कुटुंब खंबीर आहे. माझ्या डोक्याला बंदूक लावा, मी मरायला तयार आहे, संजय राऊत खोटेपणाला घाबरत नाही, तुम्ही तुमची कबर खोदायला घेतली आहे. मराठी माणसावर तुम्ही कारवाई करत आहात, पण हा मराठी माणूस आमच्या बाजूने आहे. राक्षसांचाही अंत झाला आहे, रावण, कंस सगळे मरण पावले आहेत. मी लढणारा माणूस आहे, मालमत्ता, संपत्ती आमच्यासाठी गौण आहे. मी कशाला मौनात जाऊ, मी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ३० वर्षे होतो, दररोज सकाळी मी मॉर्निंग वॉकला जातो, माझा हरेन पांड्या करा, मला गोळी झाडा. भाजपच्या नेत्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केल्यावर लगेच कारवाई केली आहे. असत्यमेव जयते, गांधीजी पुन्हा मरण पावले, असेही राऊत म्हणाले.

    – हरेन पंड्या का आठवले?

    इतकेच नाही तर गुजरात भाजपचे हत्या झालेले नेते हरेन पंड्या हेदेखील संजय राऊत यांनी आठवले. हरेन पंड्या हे गुजरातचे गृहराज्यमंत्री होते. परंतु सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची ते सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना एलीस ब्रीज परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या संशयाची सुई मोदींसह अनेकांच्या दिशेने गेली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी हेतूतः हरेन पंड्या यांच्या हत्येचा उल्लेख आपल्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर केला आहे.

    As soon as the ED hit, Sanjay Raut remembered Mahatma Gandhi and Haren Pandya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!