विशेष प्रतिनिधी
Manoj Jarange वाजवलं दादा वाजवलं अन् उपाशी उपाशी वऱ्हाड झोपवलं अशी अवस्था मनोज जरांगे पाटील यांच्या भरवशावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांची झाली आहे. महाविकास आघाडीसाठी राजकारण करत असल्याचा आरोप होत असलेले मनोज जरांगे यांनी यू टर्न घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. एका जातीवर निवडून येणे अशक्य आहे. आपले हसू होईल. त्यामुळे एकमताने हा निर्णय घेतल्याची त्यांनी सांगितले Manoj Jarange
अंतरवली सराटी येथे काल मराठा समाजाची बैठक झाली. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले, रात्री तीन वाजेपर्यंत आमची बैठक झाली. या बैठकीत सर्वच बाजूने चर्चा झाली. दरम्यान, यामध्ये खोलात जाऊन चर्चा झाली. कारण एका जातीवर निवडणूक लढवणं सोप नाही. कोणत्याचं मतदारसंघात फक्त एका जातीवर निवडून येता येत नाही. त्यामुळे स्वतःच हसू करून घेण्यात काही अर्थ नाही याच्यावर विचार झाला आणि निवडणूक न लढवता लढा चालू ठेवावा यावर एकमत झाले.
काल दिवसभर मतदारसंघनिहाय चर्चा झाली. मित्र पक्षांची पहाटे 3 वाजेपर्यंत यादीच आलीच नाही. आपले कुणीच नाही त्यामुळे कुणालाच समर्थन द्यायचं नाही, असं ठरवलं आहे. एका जातीवर निवडणूक लढवणं कसं शक्य आहे. मी राजकारणात नवीन आहे. एका जातीवर या राज्यात कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. याला पाड त्याला पाड ही आपली भूमिका नाही. उमेदवार पाडण्याची माझी इच्छा नाही. मात्र भूमिकेशी सहमत नसलेल्या उमेदवारांना पाडणार असल्याव्हेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. महाविकास आघाडी आणि महायुती मी कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. यादीच नाही तर मी तरी काय करणार. मी माझी भूमिका बदलत नाही, असेही त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांनी अंतरवाली सराटी येथे चकरा मारायला सुरुवात केली होती. अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र या सर्वांची निराशा झाली आहे.
मात्र मनोज जरांगे पाटील यांचा हा निर्णय राज्यातील महाविकास आघाडीला लाभदायक ठरण्यासाठी घेतला गेल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
As Expected Manoj Jarange back out from Assembly Election Race
महत्वाच्या बातम्या
- RPI Athwale group सतत डावलले जात असल्याने रिपाइं (आठवले गट) नाराज, महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका
- Uddhav Thackeray group उध्दव ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे का? मनसेचा घणाघात
- Jammu and Kashmir’ : जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवादी हल्ला; यूपीतील 2 तरुणांवर गोळीबार; 12 दिवसांपूर्वी 7 जणांची हत्या
- Pakistan : पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटात 7 ठार, 23 जखमी; मृतांमध्ये 5 मुले आणि पोलिसांचा समावेश