विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरे यांची नोंद होईल, अशी जहरी टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नागरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने जिंकतील, याची मला खात्री आहे. विरोधकांनी भांडणे लावायचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. त्यांची उंची तेवढी त्यांची अक्कल तेवढीच आहे, अशी टीका आज निलेश राणे यांनी कुडाळ येथे केली. As a passive CM Note by Uddhav Thackeray
आपल्याला डेवलपमेंट हवी, भांडण नको आहे. रिझल्टच्या दिवशी चारी चारी नगरपंचायतीने भारतीय जनता पक्षात विजय होईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काय उपयोग नाही. चाळीस दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही. असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कामाचे नाहीत. पण, आमदार म्हणूनही ते कामाचे नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
- निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची नोंद
- मुख्यमंत्री चाळीस दिवस घरात बसून राहिले
- भाजपचे नेते निलेश राणे यांची जहरी टीका
- चारही नागरपंचायतीत भाजपचा झेंडा फडकेल
- सर्व नगरसेवक बहुमताने निवडून येतील
- शिवसेनेकडून केवळ भांडणे लावण्याचे काम
As a passive CM Note by Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- Election : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर
- पंजाबमध्ये विरोधकांचा भाजपमध्ये जंबो प्रवेश; वीस माजी मंत्री, खासदारासह आमदारांचा प्रवेश
- पुणे : महापालिकेच्या तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; वेतनाची बिले तयार करण्यासाठी २० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त
- IMPORTANT NEWS : म्हाडाची ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारीत होणार ;वाचा सविस्तर