• Download App
    Aryan Khan : शाहरूख खानची गुप्तपणे दिल्लीवारी? राजकीय नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा । Aryan Khan: Shah Rukh Khan's secret Delhi? Discussion of meeting political leaders

    Aryan Khan : शाहरूख खानची गुप्तपणे दिल्लीवारी? राजकीय नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खान याने गुप्तपणे दिल्लीवारी केली असल्याची चर्चा सुरू आहे. शाहरुख खानने शनिवारी रात्री दिल्ली गाठली होती. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास शाहरुख खान मुंबईत परतला. मुंबई विमानतळाबाहेर पडताना शाहरुख खानने याने लपूनछपून आपल्या कारमध्ये प्रवेश केला असल्याचे म्हटले जाते. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. Aryan Khan: Shah Rukh Khan’s secret Delhi? Discussion of meeting political leaders

    ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. जवळपास २५ दिवस आर्यन खान याला कोठडीत रहावे लागले होते. तर, दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शाहरुख खानच्या दिल्ली भेटीला मोठे महत्त्व आले आहे. शाहरुख खानने आपल्या चार्टर्ड विमानाने मुंबई-दिल्ली असा प्रवास केला.



    दिल्लीमध्ये शाहरुख खानने काही राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आज दुपारच्या सुमारास शाहरुख खान मुंबईत चार्टर्ड विमानाने परतला. ही दिल्ली भेट गुप्त ठेवण्यासाठी शाहरुखने प्रयत्न केले होते, असे सूत्रांनी म्हटले. शाहरुखसोबत त्याचा नेहमीचा बॉडिगार्ड नव्हता. तर, एका अभिनेत्रीचा बॉडिगार्ड शाहरुख सोबत होता. तर, मुंबई विमानतळावरही शाहरुख खानची कार नव्हती. शाहरुखने एका दुसऱ्या कारमधून प्रवास केला असल्याची चर्चा सुरू आहे.

    आर्यन खान याला NCB च्या एसआयटीचे समन्स

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि इतर पाच प्रकरणांचा तपास आता एनसीबीच्या नव्या एसआयटीकडून होणार आहे. या प्रकरणी आता तपासाचा नवा अंक सुरु झाला असून एनसीबीने आर्यन खान आणि नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांना समन्स पाठवलं आहे. त्यांनी आजच चौकशीसाठी हजर रहावं असं त्यात सांगितलं आहे.

    एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडून आर्यन खान आणि इतर पाच महत्वाच्या प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला. एनसीबीच्या स्पेशल टीमचे प्रमुख संजय सिंह (Sanjay Singh) आता या सर्व प्रकरणांचा तपास करणार असून समीर वानखेडे त्यांना मदत करणार आहेत. संजय सिंह शनिवारी मुंबईत दाखल झाले आहेत.

    Aryan Khan: Shah Rukh Khan’s secret Delhi? Discussion of meeting political leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ