• Download App
    Aryan Khan Drugs case : आर्यन खानच्या जामिनासाठी आता कोणते असेल वकिलांचे पाऊल, काय आहेत पर्याय? । Aryan Khan Drugs case Shahrukh khan son aryan khan bail rejected drugs case lawyers to move high court for bail

    Aryan Khan Drugs case : आर्यन खानच्या जामिनासाठी आता कोणते असेल वकिलांचे पाऊल, काय आहेत पर्याय?

    Aryan Khan Drugs case : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला सध्या आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागेल. आर्यनसह तिन्ही आरोपींचे (आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा) जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. दोन्ही बाजूंनी बुधवारी न्यायालयात आपला युक्तिवाद दिला नाही. न्यायाधीशांनी आपला निर्णय थेट दिला आहे. Aryan Khan Drugs case Shahrukh khan son aryan khan bail rejected drugs case lawyers to move high court for bail


    प्रतिनिधी

    मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला सध्या आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागेल. आर्यनसह तिन्ही आरोपींचे (आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा) जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. दोन्ही बाजूंनी बुधवारी न्यायालयात आपला युक्तिवाद दिला नाही. न्यायाधीशांनी आपला निर्णय थेट दिला आहे.

    आर्यन खानचे वकील आता काय करणार?

    आर्यन खानचे वकील आता मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहेत. आर्यन खानच्या वकिलांना निकालाची तपशीलवार प्रत मिळताच ते उच्च न्यायालयात जातील. आर्यन खानचे वकील आज किंवा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करतील. आर्यन खानचे वकील, बचाव पक्षाचे म्हणणे आहे की, ड्रग्ज सेवनाच्या प्रकरणांमध्ये जामीन मिळतो, परंतु या प्रकरणात असे झाले नाही.

    आर्यन खान तुरुंगात त्रस्त

    आर्यन खान कारागृहात खूप तणावात राहतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जोपर्यंत तो क्वारंटाईनमध्ये वेगळा राहत होता, तोपर्यंत तो अॅडजस्ट करत होता. पण सध्या आर्यन उर्वरित कैद्यांसोबत राहत आहे. तो तुरुंगात 100 लोकांसोबत राहत आहे. त्याला तुरुंगाचे जेवण आवडत नाही. पूर्वी तो तुरुंगाचे अन्न खात नव्हता आणि ते इतरांना देत होता. जेवणात आर्यन कॅन्टीनमधले पदार्थ खात असे. असे कळले आहे की, आर्यन खान तुरुंगात प्रत्येकाला सांगत आहे की, तो निर्दोष आहे आणि त्याने काहीही चुकीचे केले नाही.

    एनसीबीला आर्यन खानच्या विदेशी लिंकचा संशय

    आर्यन खानला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी अटक केली. एनसीबीला आर्यन खानकडून ड्रग्ज किंवा रोख रक्कम मिळाली नाही. कोर्टात एनसीबीने म्हटले होते की, अरबाज मर्चंटसोबत सापडलेल्या ड्रग्जचे सेवन करणार होता. एनसीबी आर्यन खानच्या ड्रग्ज चॅटवरून परदेशी लिंक्सचा दावा केला. आर्यन खानच्या चॅट्स समोर आल्या आहेत, ज्यात तो परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागताना दिसत आहे. एनसीबीला ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा संशय आहे. त्यांना मोठा कट असल्याचा संशय आहे.

    एनसीबीने न्यायालयात आर्यनच्या जामिनाला कडाडून विरोध केला होता. त्यांनी म्हटले की, आरोपीला जामीन दिल्याने पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते. एनसीबीकडून आर्यन खानचा ड्रग्ज तस्करांशी संबंधाबाबत दुवे शोधले जात आहेत.

    Aryan Khan Drugs case Shahrukh khan son aryan khan bail rejected drugs case lawyers to move high court for bail

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य