• Download App
    Aryan Khan Case : रात्री 11.30 पर्यंत चालली आर्यन खानची चौकशी, एनसीबीच्या एसआयटीने 15 जणांचे जबाब नोंदवले । aryan khan drugs case ncb s sit has interrogated aryan khan till 11 30 pm

    Aryan Khan Case : रात्री 11.30 पर्यंत चालली आर्यन खानची चौकशी, एनसीबीच्या एसआयटीने 15 जणांचे जबाब नोंदवले

    क्रूझ ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची एनसीबीच्या एसआयटीने काल रात्री 11.30 वाजेपर्यंत चौकशी केली. याशिवाय खंडणीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ‘एसआयटी’ने आतापर्यंत १५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, तपासाची गती आणि दिशा याबाबत टीम समाधानी आहे. ज्ञानेश्वर सिंह हे दक्षता तपासाचे नेतृत्व करत आहेत. aryan khan drugs case ncb s sit has interrogated aryan khan till 11 30 pm


    वृत्तसंस्था

    मुंबई : क्रूझ ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची एनसीबीच्या एसआयटीने काल रात्री 11.30 वाजेपर्यंत चौकशी केली. याशिवाय खंडणीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ‘एसआयटी’ने आतापर्यंत १५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, तपासाची गती आणि दिशा याबाबत टीम समाधानी आहे. ज्ञानेश्वर सिंह हे दक्षता तपासाचे नेतृत्व करत आहेत.

    प्रभाकर साईल – समीर वानखेडे यांचेही जबाब नोंदवले

    ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, आम्ही 14-15 जणांचे जबाब नोंदवले आहेत. आम्ही लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण काही महत्त्वाच्या साक्षीदारांच्या सहभागाची आम्ही वाट पाहत आहोत.” एनसीबीच्या पथकाने साक्षीदार प्रभाकर साईल आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे जबाबही नोंदवले आहेत.



    तपासासाठी महत्त्वाच्या सर्वांशी बोलणार- सिंग

    काही गोष्टी आमच्या हातात नसल्यामुळे आम्ही तपास पूर्ण करण्यासाठी कोणतीही मुदत देऊ शकत नाही. लोकांना तपासात सामील होऊ द्या.” एनसीबी टीम आर्यन आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांचे जबाब नोंदवणार का, असे विचारले असता सिंग म्हणाले की, तपासासाठी महत्त्वाच्या सर्व लोकांशी बोलू.

    मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या भेटीबाबत ते म्हणाले की, नगराळे यांनी याप्रकरणी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. “आम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. आम्ही आणखी काही फुटेजची वाट पाहत आहोत.”

    आर्यनची दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजेरी

    न्यायालयाने गेल्या महिन्यात त्याच्या जामीन अर्जाला परवानगी देताना त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. यासह किमान सहा प्रकरणांची एसआयटी चौकशी करत आहे. एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनार्‍याजवळ एका क्रूझ जहाजावर छापा टाकून तेथून ड्रग्ज जप्त केल्याचा दावा केला होता. या छाप्यात आर्यनसह अनेकांना अटक करण्यात आली होती.

    aryan khan drugs case ncb s sit has interrogated aryan khan till 11 30 pm

    हत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस