• Download App
    आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने उडाली खळबळ । Aryan Khan Case Prabhakar Sail Death

    आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने उडाली खळबळ

    वृत्तसंस्था

    मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पंच राहिलेल्या प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंडारे यांनी ही माहिती दिली. प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. चेंबुरच्या माहुल येथील घरी त्यांचा मृत्यू झाला आहे. Aryan Khan Case Prabhakar Sail Death

    आर्यन खान हा अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी कार्डिलिया क्रूझवरील कथित रेव्ह पार्टीत सापडला होता. एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. या कारवाईवर वानखेडेंनी खंडणी उकळल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात प्रभाकर साईल पंच होता. आज त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.



    आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता.  साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी खंडणी मागितली होती, असा आरोप साईल याने केला होता.

    Aryan Khan Case Prabhakar Sail Death

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस