• Download App
    जेल की बेल? : उद्या होणार नितेश राणेंचा फैसला, संजय राऊत म्हणाले - पाताळातून शोधून काढू, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने लपवले असले तर... । Arrest Or Bell Nitesh Ranes decision will be made tomorrow, Sanjay Raut said Will find out from the abyss, if it is hidden by the Chief Minister of a state

    जेल की बेल? : उद्या होणार नितेश राणेंचा फैसला, संजय राऊत म्हणाले – पाताळातून शोधून काढू, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने लपवले असले तर…

    Nitesh Rane : कोकणातील जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परबांवर झालेल्या हल्ला प्रकरणावरून राणे कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते की, नितेश राणे यांची माहिती मी का देऊ? मी देणार नाही. यावरून त्यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे, त्या हल्ला प्रकरणावरून कोर्टात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. या प्रकरणी आता उद्या निर्णय येणार आहे. Arrest Or Bell Nitesh Ranes decision will be made tomorrow, Sanjay Raut said Will find out from the abyss, if it is hidden by the Chief Minister of a state


    प्रतिनिधी

    मुंबई : कोकणातील जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परबांवर झालेल्या हल्ला प्रकरणावरून राणे कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते की, नितेश राणे यांची माहिती मी का देऊ? मी देणार नाही. यावरून त्यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे, त्या हल्ला प्रकरणावरून कोर्टात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. या प्रकरणी आता उद्या निर्णय येणार आहे.

    पाताळातून शोधून काढू – संजय राऊत

    दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पोलीस नितेश राणेंना शोधत आहेत. केंद्रीय मंत्री म्हणताय माहिती आहे, पण सांगणार नाही. हे कायद्याचे उल्लंघन आहे. आपण केंद्रीय मंत्री आहात, पोलिसांना सहकार्य करा. कायद्यापासून महत्त्वाची माहिती लपवू नका. आपला मुलगा असेल तरी माहिती देणे गरजेचे आहे. अन्यथा आरोपींना पाठीशी घातलं म्हणून तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने लपवले असेल तर…असे सूचक विधानही त्यांनी नितेश यांचे नाव न घेता केले. यावर प्रश्न विचारला असता मी आताच बोलत नाहीय. काही सांगता येत नाही म्हणत त्यांनी कोणाचेही स्पष्ट नाव घेणे टाळले. राजकीय सुडापोटी आमच्यावर कारवाया केल्या. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

    दोन्ही बाजूंनी कोर्टात जोरदार युक्तिवाद

    दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे. भाजप आमदार नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचे फोटो एकत्र असल्याचे पुरावे कोर्टासमोर वकील घरत यांनी दाखवले. यानंतर राणेंच्या वकिलांनी फोटो कुणासोबतही असला म्हणजे संबंध असतोच असे नाही, असे सांगितले. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

    नितेश राणे अज्ञातवासात

    सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या जवळचे संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.

    नारायण राणे यांचे पोलिसांना पत्र

    पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. यावर नारायण राणे यांनी उत्तरादाखल पोलिसांना पत्र पाठवलं आहे. त्यानुसार, मी दोन-तीन दिवस व्यस्त आहे, चौकशीला प्रत्यक्ष येऊ शकत नाही, तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जबाब नोंदवा, असे नारायण राणे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

    Arrest Or Bell Nitesh Ranes decision will be made tomorrow, Sanjay Raut said Will find out from the abyss, if it is hidden by the Chief Minister of a state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!