याधी सोमय्या यांनी मनी लॉन्ड्रींग आणि जालना साखर कारखान्याच्या खरेदीवरून अर्जुन खोतकर आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर आरोप केले आहेत.Arjun Khotkar’s difficulty increased, he was accused of grabbing 100 acres of government land
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शुक्रवारी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचे छापे पडले होते.दरम्यान आता किरीट सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर आणखीएक आरोप करून त्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. अर्जुन खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्श आणि इमारतीसाठी 100 एकर जागा हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, अजित पवार तुरूंगात जाणार हा एक शब्दप्रयोग
सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन खोतकर यांच्यावर आरोप केले आहेत.याधी सोमय्या यांनी मनी लॉन्ड्रींग आणि जालना साखर कारखान्याच्या खरेदीवरून अर्जुन खोतकर आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर आरोप केले आहेत. दरम्यान ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले की, खोतकर यांना कारखान्याच्या जागेत मॉल तयार करायचा आहे. सरकारने जी जागा दिली होती ती साखर कारखान्यासाठी दिली होती. कारखान्याची एकूण 240 एकर जागा असून त्याची किंमत 1 हजार कोटी आहे.
Arjun Khotkar’s difficulty increased, he was accused of grabbing 100 acres of government land
महत्त्वाच्या बातम्या
- आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीला वाहनाची धडक; दोन वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी रुग्णालायात दाखल
- छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी चकमक, एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला केले ठार
- ARJUN KHOTKAR : जालना येथील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी; रात्री २ पर्यंत ED पथक जालन्यात
- RED ALERT : दक्षिण भारतात Red Alert ; सलग 26 दिवस पावसाचा कहर ; केरळसाठी विशेष पूर सूचना