विशेष प्रतिनिधी
बीड: Manoj Jarange बीड येथील मोर्चावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. हा जनतेचा मोर्चा आहे, वेगळेपण दाखवण्याची गरज नाही. जनते बरोबर राहिलं पाहिजे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.Manoj Jarange
मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अंजली दमानिया यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर ते म्हणाले, हा जनतेचा मोर्चा आहे, वेगळेपण दाखवण्याची गरज नाही. जनते बरोबर राहिलं पाहिजे.
दमानिया यांनी या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा दावा केला आहे. यावर जरांगे म्हणाले, त्या अरोपींचे मर्डर झाला की नाही माहीत नाही. जे माहित नाही ते बोलत नाही. हा जनतेचा मोर्चा सगळ्यांनी एकोप्याने राहिले पाहिजे. नाहीतर गैर अर्थ निघतो
आम्ही न्याय मिळे पर्यंत हटणार नाही असे सांगून जरांगे म्हणाले,- एवढी जनता अक्रोशाने रस्त्यावर निघते मग ते सरकार कसले?
अशी प्रकरणं घडत आहेत. सरकार निवडणुकीत खर्च झाल्याचं पैसे वसुली करत आहे का? हे प्रकरण आणि आरक्षणाचा प्रश्न दबत नसतो. एवढं सोपं नाही. त्या भानगडीत सरकारने पडू नये. राज्यात ज्या घटना घडल्या त्यातील आरोपींना अटक झालीच पाहिजे नाही तर जनतेला पुढे यावं लागेल.
सरकारने हे सगळं थांबवले पाहिजे. सरकारला आरोपी सापडत नाही. त्यामुळे यात शंका येतेय की आरोपी सुद्धा तुम्ही सांभाळत आहात का? आमच्या आंदोलनातील लोकांवर गुन्हे दाखल केले.आमच्या सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र खून झालेल्या आरोपी अटक करता येत नाही. आता जिल्हाभरात मोर्चे निघणार आहेत असा इशारा त्यांनी दिला.
जनतेने देशमुखांच्या लेकीला साथ द्यावी. टोळ्या सक्रिय होत आहेत त्या टोळ्यांना जनता नक्कीच पाहणार आहे. मुख्यमंत्र्यांना काय करायचे ते ठरवतील की नुसता दिखाव चालू आहे. आरोपीलाच अटक नाही आणि हे सांगतात चौकशी सुरु आहे .आमची विनंती आहे तुम्ही न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
Argument between Manoj Jarange and Anjali Damania over the march
महत्वाच्या बातम्या
- Abdul Rehman Makki : मुंबई 26/11 हल्ल्याचा कट रचणारा अब्दुल रहमान मक्की याचे निधन
- Manmohan Singh मनमोहन सिंग यांचा अपमान करणाऱ्या नवाज शरीफ यांना मोदींनी दाखविली होती ‘औकात’
- Manmohan Singh : शिष्याचा सन्मान करायची “पश्चातबुद्धी” गुरूचा अपमान कसा भरून काढेल??
- Indian Economy : पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5% दराने वाढणार; दुसऱ्या तिमाहीत विकास दर 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर