• Download App
    कोर्टात युक्तिवाद मुलांना सुधारण्याचा; बाहेर भडिमार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला घेरण्याचा!! Arguing in court to correct children

    कोर्टात युक्तिवाद मुलांना सुधारण्याचा; बाहेर भडिमार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला घेरण्याचा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात कोर्टात माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला, मुलांना सुधारण्याची संधी देण्याचा…!! पण बाहेर मात्र भडिमार चालू आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला घेलण्याचा.Arguing in court to correct children

    ही दुहेरी रणनीती सध्या वापरण्यात येताना दिसते आहे. मुंबई हायकोर्टात आर्यन खानची बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी आर्यन खान जवळ ङ्रग्ज सापडले नसल्याचा युक्तिवाद केला. आर्यन खान अरबाज मर्चंट खेरीज कोणत्या व्यक्तीला ओळखत नसल्याचेही ते म्हणाले. मुलांना सुधारण्याची संधी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांना सुधारगृहात पाठवता येऊ शकते. सरकार ड्रग्ज सेवन करणाऱ्यांना काही सुधारण्याच्या संधी देणार असल्याचे वर्तमानपत्रात वाचल्याचे ते म्हणाले. एक प्रकारे कोर्टात त्यांनी अशा प्रकारच्या युक्तिवादातून बाहेर आत्तापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांना वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला.

    कोर्टाच्या बाहेर मात्र नवाब मलिक आणि पासून संजय राऊत यांच्यापर्यंत अनेकांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि त्याचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना विविध प्रकारे घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. रोज नवे नवे आरोप करण्यात येत आहेत. समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांना ही नवाब मलिक यांनी घेरले आहे.

    या पार्श्वभूमीवर मुकुल रोहतगी यांनी आपला वकिली अनुभव पणाला लावून कोर्टामध्ये मुलांना सुधारण्याची संधी देण्याचा मुद्दा आज लावून धरला. यातून दुहेरी रणनीती दिसून येत आहे. कोर्टाने जामीन मंजूर करावा म्हणून एक प्रकारे ही “व्हिक्टिम कार्ड” खेळणे आहे. त्याच वेळी बाहेर मात्र नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एकूण तपासाविषयी संशय निर्माण करून अधिक गोंधळ वाजवण्याची रणनीती वापरली जाताना दिसत आहे.

    Arguing in court to correct children

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !