• Download App
    तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता Approval of expenditure of Rs.330 crore for revival of canals of Tilari project

    तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

    सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीस गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद  सावंत यांचीही होती उपस्थिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प नियंत्रण मंडळाची बैठकी पार पडली. याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद  सावंत यांचीही उपस्थिती होती. Approval of expenditure of Rs.330 crore for revival of canals of Tilari project

    या बैठकीत तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची कामे ३० ते ३५ वर्षापुर्वी झाली आहेत. त्यामुळे जीर्ण झालेल्या आणि गळती होणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत बैठकीत एकमत झाले. त्यासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त २२ प्रकल्पबाधितांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय घेण्यात आला. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव दिला, त्यावर धरणाचा सर्वंकष अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

    गोव्यातील अभियंत्यांच्या क्षमता बांधणीसाठी महाराष्ट्राकडून सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले. तिलारी प्रकल्पाच्या ठिकाणी कालवे पुनरूज्जीवन आणि संनियंत्रणाच्या दृष्टीने संयुक्त कार्यालय स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

    Approval of expenditure of Rs.330 crore for revival of canals of Tilari project

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!