- समीर वानखेडे यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ते कस्टम डिपार्टमेंटमध्ये रुजू होणार आहेत. Appointment of Vijendra Singh as Divisional Director Mumbai NCB
विशेष प्रतिनिधी
मुंबई : समीर वानखेडे यांचा झोनल डायरेक्टर म्हणून एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती .परंतु समीर वानखेडे यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ते कस्टम डिपार्टमेंटमध्ये रुजू होणार आहेत.
दरम्यान मुंबई अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दिल्लीत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी महसूल विभागाचे (आयआरएस ) अधिकारी विजेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याकडे विभागीय संचालक पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांनी त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील अमली पदार्थ तस्करांवर कारवाई केली होती. क्रुझवरील ड्रग्स कारवाईदरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा सापडल्यामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते.
Appointment of Vijendra Singh as Divisional Director Mumbai NCB
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण; ट्वीट करत याबाबत माहिती
- HOME ISOLATION : केंद्र सरकारकडून होम आयसोलेशनचे नवीन नियम जाहीर – जाणून घ्या सविस्तर
- PURANDAR AIRPORT : महाविकासआघाडी सरकारला धक्का! संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर विमानतळाच्या जागेची मान्यता रद्द
- “आमच्यावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देत बसू नका , तर …..” ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे