• Download App
    हवाई दलात अग्निवीरांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू : 5 जुलैपर्यंत करता येईल अर्ज; 24 जुलैला परीक्षा, 1 डिसेंबरला निकाल|Application process for Air Force firefighters starts from today Applications can be made till 5th July; Exam on July 24, results on December 1

    हवाई दलात अग्निवीरांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू : 5 जुलैपर्यंत करता येईल अर्ज; 24 जुलैला परीक्षा, 1 डिसेंबरला निकाल

    वृत्तसंस्था

    मुंबई : भारतीय हवाई दलाने अग्निवीरांसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे. 10वी पास ते डिप्लोमा धारक किंवा हवाई दलातील व्यावसायिक अभ्यासक्रम असलेले उमेदवारही अग्निवीर होण्यासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन परीक्षा 24 जुलै ते 31 जुलै 2022 या कालावधीत होणार आहे. यानंतर 10 ऑगस्ट रोजी फेज 2 साठी प्रवेशपत्र जारी केले जातील. परीक्षेचा दुसरा टप्पा 21 ते 28 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहे. मेडिकल- 29 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होईल आणि निकाल 1 डिसेंबर 2022 रोजी जाहीर होईल.Application process for Air Force firefighters starts from today Applications can be made till 5th July; Exam on July 24, results on December 1



    असा करा अर्ज

    एअरफोर्समध्ये अग्निपथसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना https://agnipathvayu.cdac.in/AV/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे अग्निपथ अर्ज फॉर्म 2022 वर क्लिक करा. 24 जून 2022 रोजी सकाळी 10 ते 05 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरले जातील.

    सन्मान आणि रजा दोन्ही मिळेल

    अग्निवीरांच्या भरतीबाबतचा सर्वात मोठा मुद्दा रजा आणि पुरस्काराचा होता. अग्निवीर सर्व लष्करी सन्मान आणि पुरस्कारांचा हक्कदार असेल, असे हवाई दलाने स्पष्ट केले आहे. त्यांना वर्षातून 30 दिवसांची रजाही दिली जाणार आहे. याशिवाय आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आजारी रजाही मिळणार आहे.

    Application process for Air Force firefighters starts from today Applications can be made till 5th July; Exam on July 24, results on December 1

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा

    म्हणे, शिंदे + अजितदादा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; पण यात संजय राऊतांनी कोणता मोठ्ठा “जावईशोध” लावला??