सेल्फीसाठी काहीही केवळ भारतीयच करतात असे नाही. बांद्रा- वरळी सी लिंकच्या केबलवर चढून स्टंट करत सेल्फी काढणाऱ्या दोघा रशियन नागरिकांना पोलीसांनी अटक केली आहे. अतिउंच ठिकाणांवर चढून सेल्फी काढण्याचा या दोघांना नाद आहे. Anything for stunt selfie … Two Russians arrested for climbing Bandra-Worli sea-link cable
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सेल्फीसाठी काहीही केवळ भारतीयच करतात असे नाही. बांद्रा- वरळी सी लिंकच्या केबलवर चढून स्टंट करत सेल्फी काढणाऱ्या दोघा रशियन नागरिकांना पोलीसांनी अटक केली आहे. अतिउंच ठिकाणांवर चढून सेल्फी काढण्याचा या दोघांना नाद आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार माकसीम स्केझरबाकोव्हे आणि वासिली कोलेसेनीकोव्ह हे दोन रशियन तरुण सर्कसमध्ये काम करतात. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या अतिउंच ठिकाणांवर चढून स्टंट करत फोटो काढण्याचा त्यांना नाद आहे. आपले फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी हे दोघे टॅक्सीने बांद्रा-वरळी सी लिंकवरून चालले होते. त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबविण्यास सांगितले. उतरल्यावर त्यांनी सी लिंकच्या स्टिल केबलकडे जायला सुरूवात केली. याठिकाणी जाण्यास पादचाऱ्यांना मनाई आहे.
माकसीमने केबलला पकडून सी लिंकच्या पिलरवर चढायला सुरूवात केली. त्याचा सहकारी फोटो आणि व्हिडीओ काढत होता. मात्र, त्यांचा हा जीवघेणा प्रकार पाहून एका जागरुक नागरिकाने पोलीसांनी पकडले. पोलीसांनी तातडीने याठिकाणी पोहोचून दोघांना अटक केली.
पोलीसांनी सांगितले की आम्ही दहशतवादी घटना असल्याचे समजून हा तपास सुरूवातीला केला होता. मात्र, पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर दोघेही स्टंटमॅन असल्याचे दिसले. आम्ही दोघांचे इन्स्टाग्राम अकाऊंट तपासल्यावर त्यामध्ये अशा पध्दतीने स्टंट केल्याचे अनेक फोटो होते.
Anything for stunt selfie … Two Russians arrested for climbing Bandra-Worli sea-link cable
हे ही वाचा
- कोरोना लसीकरणातही ठाकरे – पवार सरकारच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना दिसला तथाकथित मनूवाद!!
- महाराष्ट्र सरकारची ब्रेक द चेन नियमावलीमध्ये नव्या बदलांचा समावेश; सरकारी, खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा
- रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा , आरोग्यमंत्री टोपे यांचे कंपन्यांना आवाहन ; ‘एमआरपी’ ही कमी करण्याचा सल्ला
- काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एकाच वेळी “हात वर” आणि “खिसे खालीही”!!; २० लोकांचा फेअरमाऊंटमधील निवासाचा खर्च काँग्रेस करणार
- राष्ट्रपती – पंतप्रधानही रूग्णालयात लस घेतात, मग महाराष्ट्रातले नेते कोण लागून गेलेत, की त्यांना घरी जाऊन लस द्यावी!!; मुंबई हायकोर्ट संतापले