• Download App
    अनुष्का शर्माच्या भावनिक पोस्टची सोशल मीडियात चर्चा; विराटने कर्णधारपद सोडल्यावर लिहिली। Anushka Sharma's emotional post discussed on social media; wrote after Virat leaving the captaincy

    अनुष्का शर्माच्या भावनिक पोस्टची सोशल मीडियात चर्चा; विराटने कर्णधारपद सोडल्यावर लिहिली

    वृत्तसंस्था

    मुंबई : भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने पदाचा राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिका भारताने २-१, अशी गमावली. त्यांनतर त्याने कर्णधारपद सोडले. त्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्काने भावनिक पोस्ट लिहून अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियात या पोस्टची चर्चा होत आहे. अनुष्काने लिहिलेल्या त्या भावनिक पोस्टचा तपशील. Anushka Sharma’s emotional post discussed on social media; wrote after Virat leaving the captaincy

    अनुष्का पोस्टमध्ये लिहिते..

    “मला २०१४ मधला तो दिवस आठवतो जेव्हा तू मला सांगितले होते की, धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे तुला कर्णधार बनवले. मला आठवतंय एमएस, तू आणि मी त्या दिवशी नंतर गप्पा मारल्या होत्या कर्णधारपदाची जबाबदारी आल्यावर तो तुझी दाढी किती लवकर पांढरी होऊ लागेल, यावरून गंमत करत होता. त्यावर आपण खूप हसलो होतो. त्या दिवसापासून, खरंच मी तुझी दाढी पांढरी झालेली पाहिली आहे. मी तुझी करिअरमध्ये वाढ होताना पाहिली आहे. आणि हो, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझी प्रगती आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने जी कामगिरी केली याचा मला खूप अभिमान आहे. तुझ्या योगदानामुळे संघात जी वाढ झाली, त्याचा मला अधिक अभिमान आहे.

    २०१४ मध्ये आम्ही खूप तरुण आणि भोळे होतो. फक्त चांगला हेतू, सकारात्मक प्रेरणा तुम्हाला आयुष्यात पुढे नेऊ शकतात, असा विचार करायचो. त्याचा फायदा नक्कीच होतो, पण आव्हानांशिवाय नाही. यापैकी बरीचशी आव्हाने ज्यांचा तू सामना केलास ती नेहमीच मैदानावर नव्हती. पण मग, हे आयुष्य आहे, हो ना? ते तुमची अशा ठिकाणी परीक्षा घेते जिथे तुम्हाला त्याची अपेक्षा नसते आणि जिथे तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते. आणि मला तुझा अभिमान आहे की तुझ्या चांगल्या हेतूच्या आड काहीही येऊ दिले नाही.



    तू संघाचं खूप उत्तम नेतृत्व केलंस. जेव्हा कधी तू हरलास तेव्हा मी तू मी तुझ्या शेजारी बसायचे. तू डोळ्यांत अश्रू घेऊन विचार करायचा की अजून काही करू शकला असतास का? हाच खरा तू आहेस आणि तुला प्रत्येकाकडून हेच अपेक्षित आहे. तू सरळ बोलणारा आहेस. ढोंग हा तुझा शत्रू आहे आणि हेच तुला माझ्या नजरेत आणि तुझ्या चाहत्यांच्या नजरेत महान बनवते. कारण या सर्वांमागे तुझा शुद्ध, निर्मळ हेतू नेहमीच होता. मी म्हटल्याप्रमाणे, खरोखरच धन्य ते लोक ज्यांनी डोळ्यासमोरून तुला जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

    तू परिपूर्ण नाहीस आणि तुझ्यातही काही दोष आहेत. पण, तू ते कधी लपवण्याचा प्रयत्न केला आहे का? तू जे केलंस ते म्हणजे नेहमी योग्य गोष्टीसाठी उभे राहणे, कठीण गोष्टीसाठी उभं राहणं, नेहमी! तू लोभापायी काहीही धरून ठेवले नाही, हे पदही नाही आणि मला ते माहित आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीला घट्ट धरून ठेवते तेव्हा ती व्यक्ती स्वतःला मर्यादित करते. आणि तू अमर्याद आहेस. तू या ७ वर्षांत जे शिकलास ते आपल्या मुलीला तिच्या वडिलांमध्ये दिसेल. तू चांगलं केलंस..”

    Anushka Sharma’s emotional post discussed on social media; wrote after Virat leaving the captaincy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ