Antilia Case : अँटिलिया आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाची चौकशी करणार्या राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) अनेक नवीन पुरावे सापडले आहेत. हे पुरावे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या वसुलीच्या कारभाराशी संबंधित आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, पोलीस व प्रशासनातील काही बडे अधिकारीही या वसुलीत सामील होते. वाझेंनी या अधिकाऱ्यांना पैसे दिले होते, याचे कागदोपत्री पुरावे एनआयएला मिळाले आहेत. गिरगावातील एका क्लबवर छापा टाकल्यावर एनआयएच्या हाती पुरावे लागले. Antilia Case NIA Supsects Many Senior officials involved in Sachin Waze illegal recovery
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अँटिलिया आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाची चौकशी करणार्या राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) अनेक नवीन पुरावे सापडले आहेत. हे पुरावे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या वसुलीच्या कारभाराशी संबंधित आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, पोलीस व प्रशासनातील काही बडे अधिकारीही या वसुलीत सामील होते. वाझेंनी या अधिकाऱ्यांना पैसे दिले होते, याचे कागदोपत्री पुरावे एनआयएला मिळाले आहेत. गिरगावातील एका क्लबवर छापा टाकल्यावर एनआयएच्या हाती पुरावे लागले.
एका महिन्यात कोणत्या विभाग व अधिकाऱ्याला किती पैसे दिले गेले, हे या कागदपत्रांमध्ये नमूद केले आहे. दिलेली रक्कम प्रत्येकाच्या नावापुढे लिहिलेली आहे. अनेक पेमेंट्स कोटींमध्ये आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, ही लाचेची रक्कम असू शकते. या अधिकाऱ्यांमध्ये दोन निरीक्षक, एक पोलीस उपायुक्त आणि माजी उपायुक्त यांचा समावेश आहे. यातील तिघांची चौकशीही करण्यात आलेली आहे.
CBI, EDला पुरावे देऊ शकते NIA
NIA ही कागदपत्रे ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाला देऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या क्लबमधून ही कागदपत्रे मिळाली आहेत त्या क्लबच्या मालकालाही बोलावले आहे. वाझेशी संबंधित काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
तपासात समोर आले की, सचिन वाझे त्या क्लबला वारंवार भेट देत होते. नरेश गौर आणि माजी हवालदार विनायक शिंदे यांनाही वाझेंच्या सांगण्यावरून तेथे नोकरी देण्यात आली होती. दोघेही मनसुख हिरेन खून प्रकरणात अटकेत असून सध्या ते एनआयएच्या ताब्यात आहेत.
शिंदेकडे भांडुप-मुलुंडमधून वसुलीची जबाबदारी
एनआयएकडे जी ‘एक्स्टॉर्शन डायरी’ आणि मोबाइल आला आहे. त्यातून असे दिसून आले आहे की, वाझेने शिंदेला भांडुप, मुलुंडमधील 32 क्लब, बार आणि लॉजमधून बेकायदेशीर वसुलीची जबाबदारी सोपविली होती. प्रत्येक वसुलीवर शिंदेचे ठरलेले कमिशन होते. वाझे अशा लोकांकडूनही वसुली करायचे ज्यांची तक्रार मुंबई क्राइम ब्रांचकडे आली होती.
Antilia Case NIA Supsects Many Senior officials involved in Sachin Waze illegal recovery
महत्त्वाची बातमी
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीएम येदियुरप्पांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती
- मोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा, 100 कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाची होणार CBI चौकशी
- मी एका पायावर बंगाल जिंकेन, दोन्ही पायांवर दिल्ली जिंकेन; ममता बॅनर्जींचा हुगळीच्या सभेत दावा
- नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली भरून मृतदेह आणि जखमी नक्षलवाद्यांना जंगलात नेलेय; नक्षलवाद्यांविरोधातील लढाई तीव्र करणार; अमित शहांची ग्वाही
- राफेल सौद्यातील ‘तो’ दलाल कोण? फ्रेंच मीडियाचा दावा – क्लायंट गिफ्टच्या नावावर झाला कोट्यवधींचा भ्रष्टाचार