Antilia Case : अँटिलिया प्रकरणाची चौकशी करणार्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी बोलावले. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. एकेकाळी प्रदीप शर्मा हे निलंबित एपीआय सचिन वाझे यांचे वरिष्ठ अधिकारी होते. Antilia Case Former Encounter Specialist Pradeep Sharma at NIA Office, Parambir Singh Also Interrogated
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अँटिलिया प्रकरणाची चौकशी करणार्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी बोलावले. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. एकेकाळी प्रदीप शर्मा हे निलंबित एपीआय सचिन वाझे यांचे वरिष्ठ अधिकारी होते.
अँटिलिया प्रकरणाचा तपास सुरुवातीला एटीएसकडे होता. एटीएसने आपल्या अहवालात सांगितले होते की, मनसुख हिरेन यांनी अंधेरी पूर्वमधून अखेरचा फोन केला होता आणि त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद होता. प्रदीप शर्मा अंधेरी पूर्व येथे राहतात. यामुळे आता प्रदीप शर्मा यांच्यावर एटीएस आणि आता एनआयएचा संशय असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, एनकाउन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट मिळाले होते. त्यांनी निवडणूकदेखील लढली, परंतु त्यांचा पराभव झाला. प्रदीप शर्मा यांनी 113 एनकाउंटर केले आहेत. बनावट एन्काउंटर प्रकरणी ते तुरुंगातही गेले होते. प्रदीप शर्मा व सचिन वाझे हे मुंबई पोलिसांतील एन्काउंटर टीमचा महत्त्वाचा भाग होते.
तत्पूर्वी, एनआयएने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी केली. परमबीरसिंग सकाळी साडेनऊ वाजता एनआयएच्या कार्यालयात पोहोचले. सचिन वाझे आणि त्यांच्या कारवायांबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेत सचिन वाझे यांना परमबीरसिंग यांनी पूर्ण सूट दिली असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी गृह विभागाला पाठवलेल्या अहवालात केला आहे. सुरुवातीला अँटिलिया प्रकरणाची चौकशीही सचिन वाझे यांच्याकडेच सोपवण्यात आली होती.
एनआयएचा दावा आहे की, सचिन वाझे यांच्यासह काही पोलीसही अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येमध्ये सामील आहेत. सचिन वाझे यांच्या टीमचीही एनआयएने चौकशी केली. गेल्या महिन्यात एनआयएने एका डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याची याचसंदर्भात चौकशी केली होती.
याशिवाय एनआयएने एपीआय रियाज काझी आणि एपीआय प्रकाश होवळ यांना बर्याच वेळा चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अँटिलिया आणि मनसुख प्रकरणात एनआयएला अनेक लीड मिळाल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनआयए आता अनेक पोलीस अधिकारी आणि माजी पोलिसांना चौकशीसाठी बोलवू शकते.
Antilia Case Former Encounter Specialist Pradeep Sharma at NIA Office, Parambir Singh Also Interrogated
महत्त्वाच्या बातम्या
- ॲस्ट्राझेनेका लसीमुळे रक्तात गुठळ्यांची भीती, ब्रिटनने लहान मुलांवरील सुरू असलेले परीक्षण रोखले
- Sachin Vaze Case : मुंबई पोलिसांचा गृह विभागाला 5 पानी अहवाल, परमबीर सिंगांवर खळबळजनक आरोप
- स्थानिक लॉकडाऊनचाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, RBI गव्हर्नर दास यांनी व्यक्त केली भीती
- Mask Mandatory While Driving : कारमध्ये एकट्या व्यक्तीनेही मास्क घालणे बंधनकारक, दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
- कोरोना रुग्णसंख्येने मोडले पुन्हा सर्व रेकॉर्ड, 24 तासांत 1 लाख 15 हजार नवीन रुग्णांची नोंद, जगात सर्वाधिक आकडा