• Download App
    अँटिलिया केसमधील आरोपी एपीआय काझीही पोलीस सेवेतून बडतर्फ, पुरावे मिटवल्याचा आरोप । Antilia Case Accused API Riyazuddin Qazi Dissmissed From Police Service by Mumbai CP Nagarale

    अँटिलिया केसमधील आरोपी एपीआय काझीही पोलीस सेवेतून बडतर्फ, पुरावे मिटवल्याचा आरोप

    Antilia Case : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले सहायक पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझी यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. काझी या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांचे जवळचे असल्याचे मानले जाते. एनआयएने अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन संशयित मृत्यूच्या प्रकरणात काझी यांना अटक केली होती. Antilia Case Accused API Riyazuddin Qazi Dissmissed From Police Service by Mumbai CP Nagarale


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले सहायक पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझी यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. काझी या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांचे जवळचे असल्याचे मानले जाते. एनआयएने अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन संशयित मृत्यूच्या प्रकरणात काझी यांना अटक केली होती. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घटनेतील कलम 311 (2) अंतर्गत काझी यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले.

    यावर्षी एप्रिलमध्ये रियाझुद्दीन काझी यांना अटक करण्यात आली होती. एनआयएने कोर्टाला सांगितले होते की, संपूर्ण प्रकरणात कट रचणाऱ्यांपैकी काझी एक आहे. एनआयएने असेही म्हटले आहे की, त्यात काही सीसीटीव्ही फुटेज आढळले आहेत ज्यात वाझे आणि काझी एकत्र दिसले होते. एनआयएने असा दावा केला होता की 8 मार्च रोजी हे प्रकरण त्याच्याकडे आल्यानंतर दोन्ही आरोपींनी पुरावे मिटविणे सुरू केले.

    क्राइम इंटेलिजेंस युनिट म्हणजेच सीआययूमध्ये कार्यरत असताना काझी अनेकदा वाजे यांना त्यांच्या काही अड्ड्यांवर जात होते, असा एनआयएचा विश्वास आहे. एनआयएने म्हटले आहे की, त्यांच्या तपासानुसार रियाझुद्दीनने या प्रकरणाशी संबंधित पुरावे मिटवण्याचा प्रयत्न सचिन वाझे यांच्या आदेशानुसार केला होता.

    दरम्यान, अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ आढळल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्या स्कॉर्पओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेहदेखील संशयास्पद अवस्थेत सापडला होता. एनआयए या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहे. आतापर्यंतच्या एनआयएच्या तपासणीनुसार ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहेत.

    Antilia Case Accused API Riyazuddin Qazi Dissmissed From Police Service by Mumbai CP Nagarale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक