• Download App
    अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, बार्शीत कोरोना रुग्ण २४ तासांत बरे; डॉक्टरांचा दावा। Antibody Cocktail Treatment Is Successful In Barshi Town of Solapur District

    अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, बार्शीत कोरोना रुग्ण २४ तासांत बरे; डॉक्टरांचा दावा

    वृत्तसंस्था

    सोलापूर : अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात कमालीचा यशस्वी झाला आहे. बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा प्रयोग करून कोरोना रुग्णांना २४ तासात बरे केल्याचा दावा केला. राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे.  Antibody Cocktail Treatment Is Successful In Barshi Town of Solapur District

    बार्शीतील डॉ. अंधारे यांनी त्यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील आधुनिक उपचार पद्धतीतील मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा अँटीबॉडी कॉकटेलचा वापर केला आहे. अवघ्या २४ तासांत चांगले परिणाम दिसून आले. कोरोना संसर्गाच्या आतापर्यंतच्या उपचार पद्धतीमधील या सर्वात प्रभावी ठरलेल्या उपचार पद्धतीने 5 रुग्णांवर उपचार केले. त्यापैकी चार रुग्णांवर हे औषध अंत्यत प्रभावी ठरल्याचा दावा संजय अंधारे यांनी केला आहे.



    विशेष म्हणजे डायबिटीज, लठ्ठपणा, हायपर टेन्शन, अशा विविध आजारांसह गंभीर असलेल्या रुग्णांवर डॉ. अंधारे यांनी हा प्रयोग केला आहे. या पद्धतीत स्टिरॉइड वापर वापरले जात नाही. त्यामुळे म्युकरमायकोसिस किंवा पोस्ट कोविडचा मोठा धोका टाळत असल्याचा आहे. अवघ्या २४ तासांत परिणाम करणाऱ्या या उपचार पद्धतीमुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो आहे. राज्यातीलही हा पहिलाच प्रयोग आहे. इंजेक्शनची किंमत ही 60 हजाराच्या आसपास आहे. पण,त्रास कमी असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळात आहे.

    अँटीबॉडी कॉकटेल पद्धत नेमकी काय?

    • कोरोना संकटात आशेचा किरण ठरलेली ही उपचार पद्धत
    • कोरोना रुग्णांना दोन अँटीबॉडीज एकत्रित दिल्या जातात.
    • अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हा प्रयोग केला होता.
    • बार्शी शहरात प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा

    Antibody Cocktail Treatment Is Successful In Barshi Town of Solapur District

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस