प्रतिनिधी
मुंबई : भारतात मुस्लिमांनी लादलेल्या हलाल अर्थव्यवस्थे विरोधात हिंदू एकजूट करून मोठे आंदोलन उभे राहात आहे. हलालचे समर्थन करणाऱ्या व्यापारावर आर्थिक बहिष्कार घालून आपला पैसा हिंदू व्यापाऱ्यांनाच द्या, असे आवाहन हलाल विरोधी परिषदेत केले. Anti-Halal Conference at Savarkar Memorial: Hindus Unite
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समिती यांनी हलाल विरोधी परिषद आयोजित केली होती. त्यात अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
हलालच्या विरोधातील हे आंदोलन आता मागे घेवू नका, लव्ह जिहाद तर अकबरापासून सुरु होताच. आज हलालच्या माध्यमातून नवा जिहाद सुरू आहे. हे आंदोलन आपल्यासाठी संधी आहे, हलाल उत्पादनांवर आर्थिक बहिष्कार टाकावा. भारतात बहुसंख्यकांना त्यांच्या अधिकरासाठी लढावे लागत आहे, हे जगात पहिले उदाहरण असावे. आपण या विषयावर कृती समिती नेमावी, त्यात कोणताही पक्ष, संघटनेचा बॅनर असा भेदभाव नसावा. माझा पैसा हिंदू व्यापाऱ्यालाच जाणार, असा निश्चय करू या, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केले आहे.
९५ टक्के जनसंख्येवर हलाल जबरदस्तीने थोपवले
भारतात हलाल सक्ती कायद्याने नाही, तर मुसलमानांनी केली आहे. ही सक्ती सर्वसामान्य हिंदू मानत नाही तर तर उद्योजक मानत आहेत. त्यांना त्यांच्या व्यवसायात नुकसान होईल, अशी भीती वाटत आहे. म्हणूनच रामदेव बाबा यांच्यासारखे हिंदुत्ववादी विचारांचेही त्यांच्या व्यवसायात तोटा होईल या भीतीने हलाल प्रमाणपत्र घेत आहेत. भारतात ९५ % जनसंख्येवर हलाल जबरदस्तीने थोपवले आहे. कारण आपण सर्व जण जात, पंथ यामध्ये विभागलेले आहेत. भारतात ६० हजार जाती, उपजाती आहेत. आपण इतक्या मोठ्या प्रमाणात विभागलो आहोत आणि एकमेकांत भांडत आहोत. त्याचवेळी मुसलमानांना विरोध करायचा विषय येतो तेव्हा मात्र आपण सहिष्णू होतो. लक्षात घ्या हलाल हा जिहाद आहे. ही सुरुवात आहे, ती मांस विक्रीपासून त्याची सुरुवात झाली, आज त्याचा विस्तार बहुतांश उत्पादनांपर्यंत झाला आहे. याला आज विरोध झाला नाही, तर उद्या तुमच्या मुलाच्या लग्नात एखाद्या मुसलमान मांस खाऊ घातले, तर तो तुमच्यावर मला हराम चे मांस खाऊ घातले असे सांगत तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करू शकतो. आपण इतिहास विसरतो. १९४७ मध्ये असेच झाले, २० लाख हिंदू मारले गेले आहे. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात बलात्कार झालेल्या हिंदू महिलेला मुंबईत वेश्यागृहात विकले होते. यातून काय दिसते हिंदूच हिंदूंचे वैरी आहेत, असेही रणजित सावरकर म्हणाले.
मुसलमानांचा मनसुबा ओळखा
आपले उद्योजक ५-१० टक्के व्यवसाय कमी होईल म्हणून घाबरत असतील तर आपणच हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकू या. ब्रिटिश काळात परदेशी कपड्यांची होळी केली होतीच ना. १९४७ मध्ये जे झाले होते, तोच मनसुबा या वेळीही मुसलमानांचा आहे. त्यांनी आता २०४७ टार्गेट केले आहे, त्यावेळी भारताचा पंतप्रधान मुसलमान होईल, नव्हे संपूर्ण भारत इस्लामिक राष्ट्र होईल, असा त्यांचा दावा आहे. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यांचा मनसुबा ओळखा, असेही रणजित सावरकर म्हणाले.
मुंबईत हलाल सक्ती विरोधी परिषद संपन्न
भारतात हलालच्या माध्यमातून मुस्लिमांची समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी होण्याची, तसेच भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुंबईत १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी ‘ब्लॉसम मीडिया’कडून ‘हलाल शो’ आयोजित केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृह येथे हलाल सक्ती विरोधी परिषदेचे आयोजन रविवार, ९ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.
यामध्ये हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी लिहिलेल्या ‘हलाल जिहाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हा व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी खासदार डॉ. विजय सोनकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवला, अखिल भारतीय खाटीक महासंघाचे महाराष्ट्र प्रभारी विवेक घोलप, महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन, वीरशैव लिंगायत महासंघाचे डॉ. विजय जंगम, झटका व्यवसायी महासंघाचे संतोष गुप्ता हे उपस्थित होते.
Anti-Halal Conference at Savarkar Memorial: Hindus Unite
महत्वाच्या बातम्या
- गदा, तलवार आणि तुतारी – शिंदे गटाची तयारी : निवडणूक आयोगाला देणार 3 नवी नावे आणि 3 नवे चिन्ह, अंधेरी पोटनिवडणुकीत यापैकीच वापरणार
- 2024साठी भाजपचा मेगा प्लॅन : 2019 मध्ये गमावलेल्या जागा लक्ष्य, 40 जागांवर मोदी, तर 104 जागांवर नड्डा-शहांसह इतर केंद्रीय मंत्र्यांच्या सभा
- द फोकस एक्सप्लेनर : हिंदू देवी-देवतांचा अपमान, वाद आणि केजरींच्या मंत्र्याचा राजीनामा, वाचा सविस्तर
- WATCH देशाच्या अर्थमंत्री जेव्हा भाजी खरेदी करतात : निर्मला सीतारामन चेन्नईच्या बाजारात पोहोचल्या, स्वत: निवडून केली भाजीपाला खरेदी