विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऐन दिवाळीत मुंब्रा मध्ये एका शाखेसाठी शिवसेनेतल्या दोन गटात टक्कर झाली, पण एका उद्धवची हवा काढण्यासाठी दुसऱ्या उद्धवला समोर आणण्याची शक्कल शिंदे गटाने लढवली!! Another uddhav oppose uddhav thackeray in mubra
ही जुनीच शिवसेना स्टाईल आहे. मुंब्रा मध्ये पोलिसांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर चालवला. त्यामुळे ठाकरे गटात संताप उसळला. खुद्द उद्धव ठाकरेंनी त्या घटनेची दखल घेऊन मुंब्रा शाखेला भेट दिली आणि हिंमत असेल, तर नेभळटांनी पोलिसांना बाजूला समोर सारून टक्कर घ्यावी. आम्ही त्यांना उलथून फेकू, अशी भाषा वापरली.
अजित पवारांचे आणि सुनील तटकरे यांचे बुलडोझर मधून फुले उधळून स्वागत होऊ शकते तर उद्धव ठाकरेंनाच विरोध का??, असा सवाल करून जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या दोन गटांमधल्या भांडणाच्या आगीत तेल ओतले.
उद्धव ठाकरेंनी जरी शिंदे गटाला पोलिसांना बाजूला सारण्याचे आव्हान दिले, तरी मुंबईतली जी शाखा बुलडोझर लावून पाडली ती शाखा आपल्या नावावर होती. उद्धव ठाकरेंनी एक तरी शाखा बांधली का??, असा सवाल करून वृद्ध शिवसैनिक उद्धवराव जगताप हे समोर आले. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
उद्धवराव जगताप 96 वर्षांचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंविरुद्ध रणशिंग फुंकण्यासाठी मुंब्रात आले तरी त्यांची हवा उद्धव नावाच्याच एका जगतापाने काढून टाकली. मुंबईतली शाखा माझ्याच नावावर करायची, हे स्वतः दिघे साहेबांनी सांगितले होते. त्यामुळे त्या शाखेचे एग्रीमेंट आजही माझ्याच नावावर आहे, असे उद्धव जगताप यांनी सांगितले. आता हेच उद्धव जगताप शिंदे गटाच्या बाजूने उभे राहिल्याने ठाकरे गटाची यामुळे चांगलीच राजकीय पंचाईत झाली.
Another uddhav oppose uddhav thackeray in mubra
महत्वाच्या बातम्या
- Land For Job Scam: लालू-तेजस्वी यांच्या निकटवर्तीयावर ईडीचा फास, अमित कात्याल यांना अटक
- फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला युद्धबंदीचा केला आग्रह!
- वंदे भारत स्पेशल’ ट्रेन आजपासून नवी दिल्ली ते पाटणा या मार्गावर धावणार!
- … तर विमान लँड झालेच नसते; नाथाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना इमोशनल फोन!!