प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अजून दीड वर्षे लांब असले तरी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र होत चालली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बॅनरबाजी राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. अशातच आदित्य ठाकरे यांच्या एका बॅनरवरील मजकुरामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.
Another name in the race for the future Chief Minister among the allied parties of the Mahavikas Aghadi
आदित्य ठाकरे आज सोमवारी २२ मे रोजी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक ठिकाणी बॅनर्स झळकल्याचे पाहायला मिळाले होते. अजित पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस यांसह राज्यातील अनेक भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता आदित्य ठाकरे यांचंही नाव जोडलं गेलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ मनसर येथे आदित्य ठाकरे ‘राज्याचे भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स झळकले आहेत. नागपूरमधील उद्धव ठाकरे गटाच्या युवासेनेने आदित्य ठाकरेंचे बॅनर्स लावले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री म्हणून झळकावण्यात आलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आदित्य ठाकरे अवघ्या काही तासांचा नागपूर दौरा करणार आहेत. नागपूर दौऱ्यात आदित्य ठाकरे रामटेक लोकसभा मतदारसंघातील पारशिवनी तालुक्या अंतर्गत वराडा आणि नांदगाव परिसरात भेट दिली. वराडामध्ये कोळसा उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण आणि पिकांची हानी संदर्भात शेतकऱ्यांची भेट घेतली.
Another name in the race for the future Chief Minister among the allied parties of the Mahavikas Aghadi
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क