राहुल गांधी केवळ मतं मिळवण्यासाठी अशाप्रकारे खोटं बोलत आहेत, असा सत्यकी सावरकर यांचा आरोप आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण, लंडनमध्ये जाऊन भारतीय संसदेबाबत केलेलं वादग्रस्त विधान, मोदी आडनावाबद्दलची अपमानास्पद टिप्पणी, वीर सावरकरांचा सातत्याने अपमान या सगळ्या पार्श्वभूमीवर गमावलेलं संसद सदस्यत्व आणि त्यांच्याविरोधात अगोदरच मानहानीचा दाखललेला खटला. असे असताना आता पुन्हा एकदा वीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्य्यावरून त्यांच्याविरोधात सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी मानहानीची केस दाखल केली आहे. Another defamation case filed against Rahul Gandhi Satyaki Savarkar grandson of Savarkar complaine
लंडनमधील राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सत्यकी सावरकर यांनी तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. राहुल गांधी केवळ मतं मिळवण्यासाठी अशाप्रकारे खोटं बोलत आहेत, असा सत्यकी सावरकर यांचा आरोप आहे.
‘’राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात माझे आजोबा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळेच मी राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे.’’ असं ट्वीट सत्यकी सावरकर यांनी केलं आहे. तसेच, सत्यकी सावरकर यांनी ट्वीटसोबत राहुल गांधींचा भाषणाचा व्हिडीओही जोडला आहे.
सत्यकी सावरकर एएनआयशी बोलताना म्हणाले, ‘’राहुल गांधी गेल्या महिन्यात इंग्लंडला गेले होते. त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, सावरकर यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, त्यांना आपल्या ५ ते ६ मित्रांच्या मदतीने मुस्लीम व्यक्तीला मारहाण केल्याचा आनंद लुटला होता. मात्र, राहुल गांधींना पुस्तकाचा संदर्भ देत सांगितलेला किस्सा खोटा आहे. त्यांना काल्पनिक किस्सा सांगून सावरकरांचा अपमान केला आहे.’’
याचबरोबर ‘’राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडून अनेकदा तथाकथित माफीनामा आणि पेन्शनबाबत ऐकलं आहे. पण प्रत्यक्षात ती क्षमा याचिका आणि निर्वाह भत्ता होता. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत.’’
Another defamation case filed against Rahul Gandhi Satyaki Savarkar grandson of Savarkar complaine
महत्वाच्या बातम्या
- ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!
- Opposition Alliance Mission 2024: ‘’काय माहीत आणखी कितीजणांसमोर झुकतील नितीश कुमार?’’, भाजपाने लगावला टोला!
- COVID19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत १ हजारांहून अधिक नवीन करोनाबाधित आढळले
- सकाळी राहुल गांधी, खर्गे; सायंकाळी केजरीवाल; नितीश कुमारांच्या भेटीगाठी, विरोधी ऐक्य साधण्यासाठी की फुटीसाठी??