पाण्याच्या टाकीवर चढून आरक्षणासाठी केली घोषणाबाजी, मनोज जरांगेंशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली
विशेष प्रतिनिधी
बीड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच चिघळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. तर दुसरीकडे मराठा समाजातील तरूण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. आज बीड जिल्ह्यातील अंबोजगाई येथे एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. Another commits suicide to demand Maratha reservation Unexpectedly jumped from the water tank
आरक्षणाची मागणी करत एकाने काल एकाने अंबोजगाईमधील गिररवली येथे रात्री सव्वाबारा वाजता पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली. शत्रुघ्न अनुरथ काशीद (वय ४३, रा. गिरवली) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
कालरात्री हा व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढला आणि तिथून मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. एवढच नाहीतर मनोज जरांगेंशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून काशीद यांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याने तेवढ्यात उडी मारून आयुष्य संपवलं. आज शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ अंबोजगाई जिल्ह्यातही साखळी उपोषण सुुरू आहे. याशिवाय विविध मार्गाने मराठा बांधव आंदोलन करून आरक्षणाची मागणी करत आहेत.
Another commits suicide to demand Maratha reservation Unexpectedly jumped from the water tank
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत नागरी संरक्षण स्वयंसेवकांना काढून टाकण्याचा प्रस्ताव मंजूर; सरकारने स्वतः एलजीकडे पाठवली होती फाइल, आता केजरीवाल सुप्रीम कोर्टात
- संयुक्त राष्ट्रात इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याचा ठराव मंजूर; बाजूने 120 मते, 14 विरोधात; भारतासह 45 देशांचे मतदान नाही
- 10 वर्षांची शिक्षा ऐकताच माफिया डॉन मुख्तार अन्सारी भर कोर्टात रडत पडला आडवा!!
- दिवसभराची तोंडी वक्तव्ये आणि त्याचा प्रत्यक्ष कृतीत परिणाम!!; वाचा नेमका काय??