• Download App
    माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार|Another case against former forest minister Sanjay Rathore, woman lodges complaint with police for sexual harrasment

    माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पुण्यात पूजा राठोड या तरुणीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात मंत्रीपद गमाविलेले शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर लैंगिक अत्याचाराची आणखी एक तक्रार झाली आहे. राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार एका महिलेने पोलीसांकडे केली आहे.Another case against former forest minister Sanjay Rathore, woman lodges complaint with police for sexual harrasment

    यवतमाळ पोलिसांकडे याबाबत पोस्टाने करण्यात आली आहे. संजय राठोड यांनी माज्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार या महिलेने केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत ट्विटरवर पोस्ट केली आहे.



    शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. आजही संजय राठोड माज्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो, असं त्यात म्हटले आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले आहे.

    पूजा राठोड या तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. काही दिवसांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत घेत राठोड यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता, मात्र विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. मुंबईला येऊन 28 फेब्रुवारीला त्यांनी राजीनामा दिला होता.

    तरुणीच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे राठोड यांनी तिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची भूमिका घेत राजीनामा दिला होता. मात्र आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राठोड यांच्यावर पुन्हा एक आरोप झाल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत.

    Another case against former forest minister Sanjay Rathore, woman lodges complaint with police for sexual harrasment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!