• Download App
    अजितदादांच्या जाहीरनाम्यात मोदींचे मुद्दे, यशवंतरावांचे नाव; यशवंत वारशातून "काका" हद्दपार!! Announcement of Nationalist Congress Party Manifesto

    अजितदादांच्या जाहीरनाम्यात मोदींचे मुद्दे, यशवंतरावांचे नाव; यशवंत वारशातून “काका” हद्दपार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सगळे मोदींचेच मुद्दे आणि यशवंतरावांचे नाव आहे. पण यशवंतरावांच्या वारशातून काकांना हद्दपार करण्याची चलाखी देखील अजितदादांनी दाखवली आहे. Announcement of Nationalist Congress Party Manifesto

    शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून जी मागणी कधीही केली नव्हती, ती मागणी आपल्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच जाहीरनाम्यात अजितदादांनी करून खरा यशवंत राजकीय वारसा आपल्याकडेच असल्याचे दाखवून दिले आहे. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न किताब द्यावा, अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात केली आहे.

    शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांना आपले राजकीय गुरु मानतात, तर सुप्रिया सुळे नेहमीच यशवंतराव चव्हाण यांचा संस्कार सांगत फिरत असतात. प्रत्यक्षात शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांसाठी भारतरत्न किताब मागितल्याचा इतिहास नाही. सुप्रिया सुळे यांनी देखील 15 वर्षांच्या आपल्या संसदीय कारकीर्दीत लोकसभेत भाषण करताना यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी केल्याचाही इतिहास नाही. अशा स्थितीत अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच जाहीरनाम्यात यशवंतरावांच्या यशवंतरावांना भारतरत्न किताब देण्याची मागणी करून सत्तेच्या वळचणीला बसण्याचा खरा यशवंत वारसा आपल्याकडे असल्याचे सिद्ध करून दाखवले.

    राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा यासाठी पुढाकार घेणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे आणि परराष्ट्र धोरणाला प्राधान्य देणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.

    राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला.

    जाहीरनाम्याची वैशिष्ट्ये

    राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “सबका साथ, सबका विकास” मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

    गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. आता यासाठी राष्ट्रावादी प्रयत्न करणार आहे.

    राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणालाही महत्त दिले आहे. जाहिरनाम्यात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी पक्षाची भूमिका आहे.

    राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

    • 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन.
    • 4 कोटी लोकांना कायमस्वरूपी घरे.
    • मुद्रा योजनेचा 46 कोटी लोकांना लाभ.
    • पीएम सूर्यघर योजनेतून मोफत वीज.
    • शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे.
    • महाराष्ट्राला कौशल्य विकासाचे केंद्र बनवणे.

    Announcement of Nationalist Congress Party Manifesto

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!