• Download App
    भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून "वुमन एम्पॉवरमेंट"; विजया रहाटकर, पंकजा मुंडेंना बडी जबाबदारी!!; विनोद तावडेंकडेही "पॉवर की!!"Announcement of BJP national office bearers

    भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून “वुमन एम्पॉवरमेंट”; विजया रहाटकर, पंकजा मुंडेंना बडी जबाबदारी!!; विनोद तावडेंकडेही “पॉवर की!!”

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातून “वुमन एम्पॉवरमेंट” करीत राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे यांना मोठी जबाबदारी सोपवली आहे. Announcement of BJP national office bearers

    विजया रहाटकर या राजस्थानच्या सहप्रभारी असून पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेश सहप्रभारी म्हणून जबाबदारी कायम ठेवली आहे. 36 जणांच्या या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस असून त्यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे.

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर राष्ट्रीय स्तरापासून राज्य, जिल्हा, तालुका, मंडल स्तरापर्यंत फेरबदल करून कार्यकर्त्यांना संधी आणि जबाबदारी असे दुहेरी वाटप भाजपमध्ये सुरू आहे. यामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी तसेच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना देखील राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमले आहे.

    2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा परफॉर्मन्स उंचावण्याच्या दृष्टीने नड्ड्यांच्या या 36 जणांच्या टीमवर खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी हे नेते कसे पार पडतात यावर भाजपचा राजकीय परफॉर्मन्स तर अवलंबून आहेच, पण त्याचबरोबर संधी दिलेल्या नेत्यांचे राजकीय भवितव्याच्या दृष्टीने पुढचे पाऊलही पडणार आहे.



    पंकजा मुंडेंकडे जबाबदारी

    महाराष्ट्रातल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी “राजकीय अवकाश” घेण्याची घोषणा केली होती. परंतु दरम्यानच्या काळात त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून असा “अवकाश” घेऊ नका, अशा सक्त सूचना दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या. आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत त्यांची नियुक्ती केल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे.

    विजया रहाटकरांची कामगिरी

    विजया रहाटकर यांच्याकडे आधी दमण दीव प्रभारी पदाची जबाबदारी होती. तेथे पंचायत, जिल्हा पंचायत तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये वर्षानुवर्षी असलेली काँग्रेसची सत्ता भाजपने त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेचून आणली. त्यानंतर विजया रहाटकरांकडे 200 विधानसभा मतदारसंघ असलेल्या राजस्थान सारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी सहप्रभारी म्हणून भाजपने सोपविली आहे.

    छत्तीसगडच्या आशा लाकडा यांच्याकडेही राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. तेलंगणाच्या डी. के. अरुणा यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात दक्षिणेतील राज्यांना मोठे प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने भाजपने पुढचे पाऊल उचलले आहे.

    Announcement of BJP national office bearers

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!