विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे मनोज जरांगे ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण देण्याचा हट्ट धरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांना शिव्या देत आहेत. आजही त्यांनी असंसदीय भाषा वापरत देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना टार्गेट केले. परंतु, शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या कल्याणकारी योजना वेगाने पुढे नेल्याचे उदाहरण त्याचवेळी समोर आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 1 लाख मराठा लाभार्थ्यांचे लक्ष्य पूर्ण केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 1,00,014 लाभार्थ्यांना 8320 कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहेत.
यापैकी 90,583 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झाला असून ₹ 810.78 कोटी इतकी रक्कम व्याज परतावा देण्यात आली आहे.
काल शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबद्दल सरकारचे आभार मानले.
सरकारच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरही मंत्री यावेळी उपस्थित होते.
म्हणजे एकीकडे मनोज जरांगे ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी हट्ट धरून देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्या माहितीच्या नेत्यांना एकेरी भाषेत टार्गेट करत आहेत, तर दुसरीकडे शिंदे – फडणवीस सरकार मात्र मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांना वेगाने पुढे नेत आहे, हेच या निमित्ताने जनतेसमोर आले आहे.
Annasaheb patil mahamandal 1 lakh maratha student
महत्वाच्या बातम्या
- यूपी सरकारने लव्ह जिहादवर जन्मठेपेचे विधेयक आणले; धर्मांतर रोखण्यासाठी घेतला निर्णय, तुरुंगवास आणि दंडात वाढ
- राज्यसभेत ‘जया अमिताभ बच्चन’ म्हटल्यावर जया बच्चन संतापल्या!
- भारतात व्हॉट्सॲप बंद होणार का? आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले ‘हे’ उत्तर
- आज पुन्हा राहुल गांधी आणि काँग्रेसची अपरिपक्वता जनतेसमोर उघड झाली ‘