विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : Anna Hazare दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सीबीआयच्या तपासाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व 23 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आरोपपत्रात लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Anna Hazare
पत्रकार परिषदेत बोलताना अण्णा हजारे म्हणाले, आपला देश न्यायव्यवस्थेवर चालतो. आपल्या देशात न्यायव्यवस्था सर्वोच्च स्थानावर आहे. आपला देश खूप मोठा आहे, पक्ष-पार्टी, जाती-पाती, धर्म, इतका मोठा आपला देश आहे, पण सगळे सुरळीत चालते, याचे कारण न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्थेच्या आधारवर आपल्याला चालावेच लागणार आहे. जर न्यायव्यवस्था नसती तर हे गुंड, लफंगे, दंगली झाल्या असत्या. परंतु, न्यायव्यवस्था आहे म्हणून सगळे योग्य सुरू असल्याचे हजारे यांनी म्हटले.Anna Hazare
पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले, मी यापूर्वी अरविंद केजरीवालच्या बाबतीत जे काही म्हटले असेल तेव्हा न्यायव्यवस्थेचा निर्णय नव्हता. आता न्यायव्यवस्थेने निर्णय दिला आहे की त्यांचा काही दोष नाहीये, तर आपल्याला मान्य करावे लागेल. तेव्हा न्यायव्यवस्थेचा निर्णय नव्हता म्हणून मोघम, हवेत बोलले जात होते. जर तेव्हा न्यायव्यवस्थेचा निर्णय असला असता तर मी असे काही म्हटलेच नसते.
अण्णा हजारे म्हणाले, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोडिया हे माझे जुने कार्यकर्ते आहेत. मी त्यांना एकच सल्ला देईल की, समाज आणि देशाच्या हितासाठी जे काही करता येईल ते करत रहा. स्वतःच्या आणि पक्षाबद्दल विचार नका करू. देशाचा विचार करा. देशाला पुढे न्यायचे आहे. अनेकांच्या बलिदानाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, हे विसरून चालणार नाही.
Anna Hazare Reaction Arvind Kejriwal Acquittal Delhi Excise Case VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- WhatsApp : 1 मार्चपासून सिम कार्डशिवाय व्हॉट्सॲप चालणार नाही; सरकारचा मुदतवाढ देण्यास नकार
- दोन राष्ट्रवादींच्या घामासानात सगळ्याच पवारांचा एकछत्री अंमल धोक्यात!!
- महायुती सरकारवर सतत टीका करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांचा सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे सन्मान; साहित्य भूषण पुरस्कार प्रदान
- राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखरायच्या बेतात!!