• Download App
    भावनेच्या भरात अंकुश काकडे बोलून गेले, असे पवार साहेब निर्णय मागे घ्या अन्यथा खेड्यातील लोक आत्महत्या करतील!!Ankush kakde spoke to in full of emotion

    भावनेच्या भरात अंकुश काकडे बोलून गेले, असे पवार साहेब निर्णय मागे घ्या अन्यथा खेड्यातील लोक आत्महत्या करतील!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण सेंटरसह महाराष्ट्रात राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हलकल्लोळ उडाला. बडे – बडे नेते पवारांसमोर रडले. अनेकांनी त्यांच्या विनवण्या केल्या. Ankush kakde spoke to in full of emotion

    यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये हजारो कार्यकर्ते भावूक झालेले दिसले. यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे होते पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची “जयोस्तुते” या कवितेतल्या दोन काव्यपंक्ती आळविल्या. “तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण”, असे पवारांना ऐकवत त्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

    पण त्या पलीकडे जाऊन भावनेच्या भरात अंकुश काकडे एक वाक्य बोलून गेले, पवार साहेबांचे हे पुस्तक प्रकाशित झाले नसते तर बरे झाले असते, असे वाटायला लागले आहे. पवार साहेब, तुम्ही राजीनामा मागे घेतला नाहीत तर महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यातील लोक आत्महत्या केलेली तुम्हाला पहावी लागेल आणि हे जे व्हावे असे वाटत नसेल तर तुम्हाला आपला निर्णय मागे घ्यावाच लागेल!! अंकुश काकडे भावनेच्या भरात बोलून गेले. त्यातून पवारांवरचे त्यांचे प्रेम दिसून आले. पवारांनी देखील कार्यकर्त्यांचा आग्रह मानून दोन-तीन दिवस वेळ देण्याची विनंती केली आहे. त्यानंतर ते आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत.

    Ankush kakde spoke to in full of emotion

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!