• Download App
    Girish Bapat Passed Away : राजकारणातील विरोधक परंतु तितकाच घनिष्ठ मित्र; गिरीश बापटांच्या निधनानंतर अंकुश काकडे माध्यमांसमोर रडलेAnkush Kakade weeps in front of the media after the death of political adversary but close friend Girish Bapat

    Girish Bapat Passed Away : राजकारणातील विरोधक परंतु तितकाच घनिष्ठ मित्र; गिरीश बापटांच्या निधनानंतर अंकुश काकडे माध्यमांसमोर रडले

    Ankush kakde new

    सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही, तेवढं गिरीश बापट यांनी माझ्यावर प्रेम केलं. असंही काकडे म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवार) पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. एक सर्वसमावेशक नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. केवळ भाजपाच नव्हे तर अन्य पक्षातील नेत्यांनाही ही बातमी ऐकल्यानंतर अतिशय दु:ख होत आहे. गिरीश बापटांचे राजकीय विरोधक मात्र तेवढेच जवळचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे हे प्रसारमाध्यमांशी बोलताना अक्षरशा ढसाढसा रडले. Ankush Kakade weeps in front of the media after the death of political adversary but close friend Girish Bapat

    अकुंश काकडे म्हणाले, ‘’भाऊ गेले असं मला वाटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करतो. मी सोमवारी त्यांची भेट घेतली, आयसीयूमध्ये ते होते आणि नुकतेच डायलिसीस करून ते आले होते, त्यामुळे थोडे थकल्यासारखे वाटत होते. मला आठवतं की २२ मार्च रोजी जेव्हा मी त्यांना भेटण्यास आलो, आठवड्यातून दोन दिवस मी नियमीतपणे ते ज्या ठिकणी होते तिथे भेटण्यास जायचो. राज ठाकरेंची सभा होती त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता मी त्यांना भेटायला आलो. नुकते डायलिसीस करून ते आले होते आण त्यावेळी त्यांनी माझ्याजवळ खंत व्यक्त केली, की अंकुश नकोसं वाटतं आता, मी केव्हा सुटतोय असं मला झालं आहे. जवळपास साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो. राज ठाकरेंची सभा पाहत असताना, त्यावर काही कॉमेंट्स देखील त्यांनी केल्या. प्रकृती अतिशय ढासाळत होती. पण एवढ्या लवकर काही होईल, असं वाटलं नाही. दुर्दैवाने ते घडलं. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही.’’


    Girish Bapat Passed Away : राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले – देवेंद्र फडणवीस


    याशिवाय ‘’आमच्या मैत्रीच्या खूप घटना आहेत. म्हणजे सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही, तेवढं गिरीश बापट यांनी माझ्यावर प्रेम केलं. पुणे महापालिकेत गॅस नावाने आम्ही तिघे होतो. तिघेजणही विविध पक्षात होतो. शांतीलाल काँग्रेसमध्ये होते, गिरीश भाजपात आणि मी राष्ट्रवादीमध्ये होतो. गिरीश बापट हे कधीच कुणाला घाबरायचे नाहीत. गिरीश बापट हे त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ होते, आजपर्यंत त्यांनी पक्षाशी कधीही गद्दारी केली नाही. ते कसबा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा राहिला तेव्हा मी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण देखील त्याला मत देऊ शकलो नाही ही वस्तूस्थिती आहे.’’ असंही काकडे यांनी सांगितलं.

    याचबरोबर ‘’जवळपास दोन वर्षांपासून ते आजारी होते व त्यातील वर्षभरापासून ते अंथरूणाला खिळून होते. खूप आठवणी आहेत, सगळ्याच आठवणी मला आता सांगता येणार नाही. परंतु मी राजकारणात काम करणाऱ्या सांगू इच्छितो, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आपण करावं, राजकारणात निख्खळ मैत्री कशी असावी ही गिरीश बापटांकडे पाहून आपण करावी आणि सध्याच्या या गढूळ राजकारणात गिरीश बापटांसारखी मैत्री आपण ठेवावी. एवढच माझं नवीन तरूण कार्यकर्त्यांना आवाहन असेल.’’असं शेवटी अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे.

    Ankush Kakade weeps in front of the media after the death of political adversary but close friend Girish Bapat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार