प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange तीन दिवसांपूर्वी एका सभेत मनोज दादांना चक्कर आली होती. म्हणून तब्येतीची विचारपूस करावी, आतापर्यंत भेटलो नव्हतो. फक्त फोनवर चर्चा झाली. पुढे त्यांना काही आमची मदत हवी असेल, ताकद येण्यासाठी म्हणा, मी नक्कीच त्यांच्यासाठी उभी असणार आहे. तसेच संतोष देशमुख हत्याप्रकरणाबाबत पुढे काय दिशा ठरवायची, यावर चर्चा झाली असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.Manoj Jarange
याप्रसंगी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, संतोष देशमुख खून प्रकरणाची चार्जशीट अर्धवट वाटत आहे. आरोपी सुदर्शन घुलेचं स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आलं, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं आहे. कारण त्यात खुनानंतर पुढे काय झालं, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही. याबाबत चकार शब्दसुद्धा स्टेटमेंटमध्ये लिहिलेले नाहीत. पोलिसांनी अर्धवट स्टेटमेंट का घेतलं, मी मागे म्हटलं होतं की, दहा लोक आहेत. त्यांना सहआरोपी करणे गरजेचे होते. व्हिडिओवर राजेश पाटील दिसले, प्रशांत महाजन दिसले, हे सगळे असताना त्यांच्यावर कारवाई झाली नाही. यापैकी कुणालाही सहआरोपी केले नाही. यांना जर सहआरोपी केलं तर याचे धागेदोरे थेट धनंजय मुंडेंपर्यंत जातात, म्हणून हे मुद्दाम केले गेले नाही, असा आरोप दमानिया यांनी याप्रसंगी केला आहे.
तब्येतीच्या विचारपूससाठी भेट
अंजली दमानिया तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईहून आल्या. त्यांचा कामाचा आवाका मोठा आहे. तरी पण त्यांनी ठरवलं भेटायला जाऊ. बीडला शिक्षकांच्या कार्यक्रमांमध्ये माझं अंग गार पडलं होतं. त्यानिमित्ताने ताई भेटायला आल्या. दुसरे काही नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
Anjali Damania meets Manoj Jarange; discusses Santosh Deshmukh murder case
महत्वाच्या बातम्या
- Jaipur bomb blast : जयपूर बॉम्बस्फोटाशी संबंधित अतिरेक्याला अटक; ईदसाठी रतलामला गेला होता, 5 लाख रुपयांचे बक्षीस
- mamata banerjee ममतांच्या शिक्षक भरती घोटाळ्याला सुप्रीम कोर्टाचा दणका; 25000 शिक्षकांना नोकऱ्या गमवायची वेळ!!
- Organ donation : अवयवदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 42 दिवसांची सुटी; अवयवदानाला प्रोत्साहन देण्याचा केंद्राचा निर्णय
- ममतांच्या शिक्षक भरती घोटाळ्याला सुप्रीम कोर्टाचा दणका; 25000 शिक्षकांना नोकऱ्या गमवायची वेळ!!