विशेष प्रतिनिधी
सांगली :आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याकडे 650 कोटी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय अधिकारी मानले जातात. Anil Parab’s close RTO officer Bajrang Kharmate has assets worth Rs 650 crore, Kirit Somaiya alleges
सोमय्या यांनी वंजारवाडी (ता. तासगाव) येथे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या आलिशान घराची यांनी पाहणी केली. अनिल परब यांची इडीकडून चौकशी सुरू असून त्याचे धागेदोरे सांगली जिल्ह्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बजरंग खरमाटे यांच्याकंदीलबेनामी संपत्ती अनिल परब यांचीच असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.एक आरटीओ अधिकारी एवढे पैसे कुठून कमवू शकतो, यातूनच ही बेनामी संपत्ती असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.
ईडीने आरटीओ अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांच्या घरावर छापा टाकला होता. खरमाटे हे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब मंत्री असलेल्या आरटीओ विभागात कार्यरत आहेत. खरमाटे यांच्यावर आरटीओ विभागातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.
निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तक्रार पत्रात परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप केला आहे. पाटील यांच्या तक्रारीनुसार, अनिल परब यांच्या सांगण्यावरून आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगसाठी कोट्यवधी रुपयांची मोठी रक्कम गोळा करण्यात आली. अशा प्रकारे २५० ते ३०० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. १५ मे रोजी देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की या रॅकेटचा मास्टरमाईंड वर्धा येथे कार्यरतडेप्युटी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे आहे.
Anil Parab’s close RTO officer Bajrang Kharmate has assets worth Rs 650 crore, Kirit Somaiya alleges
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णाला व्हेंटिलेटरची खरोखरच गरज आहे का? भारतीय संशोधकाने केले एआय टूल विकसित
- कोरोना लसीकरणात भारत जगात अव्वल, विकसित राष्ट्रांच्या जी-७ देशांनी मिळून ऑगस्टमद्ये दिले १० कोटी डोस तर भारतामध्ये एकाच महिन्यात १८ कोटी
- पंजशीर खोऱ्यात नॉर्दन अलायन्सकडून तालीबानला जबरदस्त दणका, ६०० तालीबानी ठार
- गांधी परिवारात प्रशांत किशोर यांच्या कॉँग्रेस प्रवेशाची चर्चा पण विरोध करत वरिष्ठ नेते म्हणतात ते तर फुस्स बॉँब