वृत्तसंस्था
मुंबई : ठाकरे – पवार सरकार मधील परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांना ईडीने समन्स आज 15 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्याचे समन्स बजावले आहे. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांना ईडीने हे समन्स बजावले आहे. Anil Parab ED Inquiry: Order to be present at 10.00 am today !!
अनिल परब गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्याशी संबंधित सात संस्थांवर ईडीने काही दिवसांपूर्वी छापे घातले होते. त्यानंतर आता ईडी अनिल परब यांना अटक करणार का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनिल परब यांना अटक झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना लक्ष्य?
अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या पाठोपाठ केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेचे काही मातब्बर नेतेही केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग भाजपने बांधला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स आणि सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.
अनिल परब यांचा दावा
काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यावेळी साई रिसॉर्टबद्दल अनिल परब यांची चौकशी केली होती. ईडीच्या छापेमारीनंतर अनिल परब म्हणाले होते की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर आणि माझ्याशी संबंधित छापेमारी केली आहे. दापोलीचे साई रिसॉर्ट हे सदानंद कदम यांचे आहे. तसा दावा त्यांनी कोर्टात केला आहे, त्याची सर्व कागदपत्रे ही त्यांनी जमा केली आहेत. हे रिसॉर्ट अजून सुरू झाले नाही. तरीही या रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जात असल्याची केंद्रीय पर्यावरण खात्याने तक्रार केली. त्याच तक्रारीवरुन ईडीची कारवाई आहे. हे रिसॉर्ट सुरूच नाही तर कारवाई कशी केली जाते? हा प्रश्न आहे.
Anil Parab ED Inquiry: Order to be present at 10.00 am today !!
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद पाणीप्रश्न : राज्यपालांनी मोदींसमोर समस्यांचा पाढा वाचल्याची मराठी माध्यमाची मखलाशी; पण ही तर दारूण वस्तुस्थिती!!
- मोदी – शहांचे वळले महाराष्ट्राकडे “लक्ष”; मोदींच्या दौऱ्यानंतर अमित शहांचा 21 जूनला त्र्यंबकेश्वरला कार्यक्रम!!
- देह शिळा मंदिर उद्घाटन : धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीण गेला!!
- दिल्ली – मुंबईत दिवसभर चर्चा पवारांचीच!!; पण “नकार” शब्दाभोवती फिरलेली!!