प्रतिनिधी
अहमदनगर : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी पवार कुटुंबियांवर टीका करताना जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. पण त्याच दिवशी चौंडीतील कार्यक्रमातील माजी आमदार अनिल गोटे यांची पवारांच्या हजेरीत जीभ घसरली. राजमाता पायलीला 50 पडल्यात आणि महाराण्या फुटाफुटांवर आढळतात, अशी अश्लाघ्य शेरेबाजी अनिल गोटे यांनी केली. त्यावर पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. Anil Gote’s tongue slipped in Pawar’s presence
अनिल गोंटे यांनी आपल्या भाषणात राजमाता आणि महाराणींचा अवमान केल्याचा आरोप करून त्यांचा निषेध करण्यासाठी आज गुरूवारी दुपारी जामखेड येथील खर्डा चौकात अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमी निदर्शने करणार आहेत.
चौंडीतील कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार रोहित पवार यांनी जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केले. या शक्तिप्रदर्शनातच अनिल गोटे यांची जीभ घसरली. त्यांनी सुरुवातीलाच अहिल्यादेवींचा उल्लेख राजमाता किंवा महाराणी असा न करता पुण्यश्लोक असा करावा, अशी सूचना मांडली. मात्र, एवढेच बोलून ते थांबले नाही तर पुढे जाऊन त्यांची जीभ घसरली. अहिल्यादेवींना फक्त लोकमाता किंवा पुण्यश्लोक म्हणा. त्यांना राजमाता किंवा महाराणी म्हणू नका, असे बोलून तुम्ही त्यांचा अपमान करताय. राजामाता पायलीच्या 50 पडल्या आहेत आणि महाराणी फुटाफुटावर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांच्या या वक्तव्याला मंचावरच्या कोणीही हरकत घेतली नाही.
– पडळकर, खोतांवर गुन्हे
मात्र त्याच दिवशी चौंडीत येत असलेल्या पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी चौंडीबाहेरच रोखून धरले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर तसेच पवार कुटुंबियांवर टीका केली होती. या प्रकरणी नंतर धनगर समाजातील काही व्यक्तींनी तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन पोलिसांनी पडळकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता पवार यांच्या उपस्थित गोंटे यांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दा पुढे आला आहे. गोटे – पवारांचा निषेध करण्यासाठी गुरूवारी दुपारी 3.00 वाजता जामखेडमधील खर्डा चौकात निदर्शने करणार आहेत. यासाठी अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. तेथून जामखेड तहसिलदार कार्यालयात जाऊन गोंटे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
– भाजपकडून निषेध
भाजपनेही गोंटे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी म्हटले आहे की, ‘राजमाता हे विशेषण महाराष्ट्रातील ठराविकच महान स्त्रियांना लावले जाते. गोंटे यांच्या या वक्तव्याने त्यांचा अवमान होत आहे. त्यामुळे भाजप गोटे आणि कार्यक्रम संयोजकांचा जाहीर निषेध करत आहे.
Anil Gote’s tongue slipped in Pawar’s presence
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये स्वतंत्र जातीनिहाय जनगणनेस सर्वपक्षीय मंजूरी; केंद्र सरकारची भूमिका काय??
- महिलांच्या अधिकारावर ‘सुप्रीम’ निर्णय : कोर्टाने म्हटले- कुटुंबातील सदस्यांना आवडत नसले तरी स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही
- नेत्यांची गळती : जे निराश होते ते निघून गेले, खरे लढणारे काँग्रेसमध्येच!!; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
- सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांसह किती जणांच्या अडचणी वाढवणार??