देशमुखांचे वकिल अनिकेत निकम यांनी अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती केली होती.Anil Deshmukh’s difficulty increases; Judicial custody till November 29
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनिल देशमुख यांची ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. दरम्यान, त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु आज १५ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुखांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.म्हणजे आता २९ नोव्हेंबर पर्यंत अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.
देशमुखांचे वकिल अनिकेत निकम यांनी अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती केली होती.तसेच “अनिल देशमुख यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमीनवर झोपताना पाठिला त्रास होत आहे. त्या़ंचे वय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेडची मागणी मान्य करावी” असा अर्ज त्यांचे वकिल इंद्रपाल सिंह यांनी केला आहे.दरम्यान न्यायालयाने अनिल देशमुखांना खासगी वैद्यकीय उपचार, औषध आणि बेडची परवानगी दिली आहे.परंतु न्यायालयाने देशमुखांना घरचे जेवण देण्यास मंजुरी दिलेली नाही.
Anil Deshmukh’s difficulty increases; Judicial custody till November 29
महत्त्वाच्या बातम्या
- Petrol Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, लवकरच भारतात पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
- शिवसृष्टी उभारण्याची बाबासाहेब पुरंदरे यांची इच्छा लवकर पूर्ण करा; उदयनराजेंची सरकारला विनंती
- बाबासाहेबांच्या रूपातले व्रतस्थ इतिहास तपस्वी आपल्या सोडून गेले; खासदार संभाजीराजेंची श्रद्धांजली
- तमिळनाडूपाठोपाठ आता केरळमध्ये पावसाची धोक्याची घंटा