विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैशांचा गैरव्यवहाराबाबत ईडी कडून नोटीस बजावण्यात येत होत्या. यासंदर्भात ते मुंबई उच्च न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. यामागचे कारण देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
Anil deshmukh regarding enquiry about money laundering case
अनिल देशमुख म्हणतात की मी ईडीपासून पळत नाही आहे. ते म्हणाले की, मी त्यांच्या कारवाई पासून पळतोय हा गैरसमज आहे. ईडी कडून निःपक्षपातीपणे कारवाई होणार असेल तरच मी त्यांना तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी न्यायमूर्ती नितीन एम जमादार आणि सारंग व्ही कोतवाल यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद मांडला. ते म्हणाले की, कुठलाही वैयक्तिक हेतू नसेल अशा लोकांकडूनच देशमुख यांची चौकशी केली जावी. देशमुख यांना जबरदस्तीच्या कारवाई पासून सुरक्षा देण्यात यावी तसेच ईडीने निष्पक्षतेच्या मापदंडाचे पालन करावे अशी मागणी त्यांनी न्यायालयासमोर केली. सूडबुद्धीने आणि मनमानीने ही चौकशी काही अधिकाऱ्यांकडून केली जात आहे असा आरोप देशमुख यांच्या वकिलांनी केला. अनिल देशमुख यांच्याबद्दल चुकीची धारणा निर्माण व्हावी तसेच माध्यमांना ते वाईट व्यक्ती आहेत असे दाखवण्यात यावे यासाठी हे सर्व केले जात आहे असा आरोप त्यांनी केला.
Anil deshmukh regarding enquiry about money laundering case
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या काळात सर्वात धडाडीचे काम योगी सरकारचे, ऑक्सिजन कमतरतेवर यशस्वी मात, कानपुर आयआयटीकडून कौतुक
- ऐन दसरा – दिवाळीच्या तोंडावर सिलिंडर दरवाढीने ग्राहक गॅसवर, वर्षात तीनशे रुपयांची दरवाढ
- जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या नेहा नारखेडे
- कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरून रशियान बनविली ‘स्पुटनिक’ लस, ब्रिटनचा खळबळजनक आरोप