• Download App
    Anil Deshmukh : पालांडे डील करायचे, शिंदे पैसे घ्यायचे, देशमुखांच्या स्वीय सहायकांवर आरोप, ईडी पुन्हा बजावणार समन्स । Anil Deshmukh PA Palande And Shinde Arrested by ED could be Main Link in 100 Crore Currption Case

    Anil Deshmukh : पालांडे डील करायचे, शिंदे पैसे घ्यायचे, देशमुखांच्या स्वीय सहायकांवर आरोप, ईडी पुन्हा बजावणार समन्स

    Anil Deshmukh  : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांनी पदाचा गैरवापर करून सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टारगेट दिले होते असा आरोप केला होता. याप्रकरणी ईडी आता चौकशी सुरू केली असून काल अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहायकांना अटक केली. आरोपांच्या पडताळणीसाठी ईडीने काही बार मालकांकडे चौकशी केल्यावर या बार मालकांनी देशमुखांना तीन महिने चार कोटींचा हप्ता दिल्याचे कबूल केले आहे. यामुळे ईडी आता देशमुखांभोवती फास आवळला असून त्यांच्या स्वीय सहायकांच्या चौकशीतून मोठी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Anil Deshmukh PA Palande And Shinde Arrested by ED could be Main Link in 100 Crore Corruption Case


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांनी पदाचा गैरवापर करून सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टारगेट दिले होते असा आरोप केला होता. याप्रकरणी ईडी आता चौकशी सुरू केली असून काल अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहायकांना अटक केली. आरोपांच्या पडताळणीसाठी ईडीने काही बार मालकांकडे चौकशी केल्यावर या बार मालकांनी देशमुखांना तीन महिने चार कोटींचा हप्ता दिल्याचे कबूल केले आहे. यामुळे ईडी आता देशमुखांभोवती फास आवळला असून त्यांच्या स्वीय सहायकांच्या चौकशीतून मोठी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    पलांडे, शिंदेंची भूमिका महत्त्वाची

    ईडीने अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना कालच अटक केली. त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य न केल्याने अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासात देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहायक दोषी असल्याचे दिसून येत आहे. वसुलीसाठी ज्या काही डील व्हायच्या त्यात पालांडे आणि शिंदे यांची महत्त्वाची भूमिका होती, अशी माहिती माध्यमांनी ईडी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. देशमुखांचा स्वीय सहायक संजीव पालांडे हा डील फिक्स करायचा, तर कुंदन शिंदे हा पैसे घ्यायचा, असा ईडीने दावा केला आहे. दोघांचीही चौकशी सुरू आहे. ईडीला आता देशमुखांची पुन्हा चौकशी करायची आहे.

    देशमुखांना पुन्हा समन्स

    संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या चौकशीतून अनेक गुपिते बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ईडी अधिकारी अनिल देशमुखांना चौकशीला पुन्हा बोलावणार असून यासाठी देशमुख यांना पुन्हा समन्स पाठवणार आहे. पुढच्या आठवड्यात देशमुख पुन्हा ईडीच्या चौकशीच्या सामोरं जाऊ शकतात.

    वाझेंचाही जबाब

    पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझेंनीही जबाब नोंदवला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील 10 ते 12 बार मालकांचेही जबाब नोंदवले. या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. यानंतर आता ईडीच्या कारवाईने वेग घेतला आहे. या सर्व प्रकारामुळे अनिल देशमुखांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

    Anil Deshmukh PA Palande And Shinde Arrested by ED could be Main Link in 100 Crore Corruption Case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य