Wednesday, 7 May 2025
  • Download App
    ईडीच्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा ठपका, अनिल देशमुखांना १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश|Anil Deshmukh ordered to appear in court on November 16 for deliberately ignoring ED summons

    ईडीच्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा ठपका, अनिल देशमुखांना १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने बजावलेल्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे, असा ठपका अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. देशमुख यांना १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला.Anil Deshmukh ordered to appear in court on November 16 for deliberately ignoring ED summons

    पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीपुढे चौकशीसाठी हजर न राहिल्याने ईडीने देशमुख यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १७४ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायदंडाधिकारी आर.एम. नेर्लीकर यांच्यापुढे सुनावणी झाली. ईडीने बजावलेले समन्स आरोपी, त्यांची मुलगी किंवा त्यांच्या वतीने वकिलांनी घेतले. प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध केस होत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.



    देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा १०० कोटींचा हप्ता वसुलीचे टार्गेट तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेला दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्याबाबत सीबीआय व ईडीने चौकशी सुरू केली. ईडीने मुंबई, नागपूर येथील देशमुख यांच्या निवासस्थानी छापे टाकून मुंबईत जवळपास आठ तास त्यांची चौकशी केली.

    नंतर ईडीने देशमुख यांना कार्यालयात हजर राहाण्याची सूचना केली होती. देशमुख यांनी शनिवारी कार्यालयात जाणे टाळले. त्यांचे वकील जयवंत पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह साडेअकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात हजर झाले.

    त्यांनी अधिकाºयांना समन्सचे उत्तर देताना आपल्या अशिलाकडे कोणत्या विषयासंबंधी चौकशी करायची आहे, त्यासंबंधी कसलाही उल्लेख नाही, तो कळवावा, त्यानुसार संबंधित कागदपत्रे घेऊन त्यांना उपस्थित राहाता येईल, असे सांगितले. त्यामुळे ईडीने हप्तावसुलीबाबत चौकशी करायची आहे असे स्पष्ट केले होते.

    निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने दिलेल्या जबाबामध्ये या दोघांच्या सांगण्यावरून तीन महिन्यांत त्यांना एकूण ४.७० कोटी दिल्याचे म्हटले आहे. त्याच्याकडून ही रक्कम दिल्लीत आणि तेथून नागपूरला एका ट्रस्टकडे वळविण्यात आल्याची माहिती ईडीच्या तपासातून समोर आली आहे.

    Anil Deshmukh ordered to appear in court on November 16 for deliberately ignoring ED summons

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!