• Download App
    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख मुख्य आरोपी; ईडीचे कोर्टात 7000 पानी पुरवणी आरोपपत्र । Anil Deshmukh main accused in money laundering case; 7000 water supplement chargesheet in ED's court

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख मुख्य आरोपी; ईडीचे कोर्टात ७००० पानी पुरवणी आरोपपत्र

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि बार चालकांकडून शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृह मंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मुख्य आरोपी बनवले आहे. Anil Deshmukh main accused in money laundering case; 7000 water supplement chargesheet in ED’s court

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पीएमएलए कोर्टात आज ईडीने तब्बल 7000 पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केले. त्यामध्ये अनिल देशमुखांना मुख्य आरोपी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही आरोपी करण्यात आले आहे.



    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्या काटोल, नागपूर आणि मुंबई शहरांमधील घरांवर ईडीने छापे घातले होते. त्यावेळी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांची साडेचार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर या दोघांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या कायदेशीर कारवाई अंतर्गत ईडीने आज 7000 पानांचे पुरवणी आरोपपत्र पीएमएलए कोर्टात दाखल केले आहे. यामध्ये अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी केले असून ऋषिकेश देशमुख यांना देखील आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे.

    Anil Deshmukh main accused in money laundering case; 7000 water supplement chargesheet in ED’s court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस