प्रतिनिधी
मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकार मधले गृहमंत्री अनिल देशमुखांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यांच्यावर जे. जे रुग्णालयातच उपचार केले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.. अनिल देशमुखांच्या खांद्यावर खासगी रुग्णालयात उपचार व्हावेत, यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावर न्यायालयाने ईडीकडे उत्तर मागितले होते. ईडीने दाखल केलेल्या उत्तरानंतर,न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. Anil Deshmukh is not a private song, but J. J. Treatment will have to be taken at the hospital !!
अनिल देशमुख यांचे वय झाले आहे. ते तुरुंगातील बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये त्यावरचे उपचार करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करून करू द्यावेत, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी मुंबई सत्र न्यायालय केला होता.
त्यावर न्यायालयाने ईडीडून जबाब मागवला होता. परंतु ईडीने अनिल देशमुख यांच्या अर्जाला विरोध केला. जे. जे. रुग्णालयात अनिल देशमुखांवर चांगले उपचार होऊ शकतात. तेथे चांगली वैद्यकीय सोय उपलब्ध आहे, असे ईडीने कोर्टाचा स्पष्ट केले. त्यानंतर कोर्टाने अनिल देशमुख यांना जे. जे. मध्येच उपचार करून घेण्यास सांगितले आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी नाकारली.
Anil Deshmukh is not a private song, but J. J. Treatment will have to be taken at the hospital !!
महत्वाच्या बातम्या
- NIA Action : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून टेरर फंडिंग; डी कंपनीच्या दोघांना अटक!!
- एकीकडे महागाईच्या उच्चांकी झळा; तर दुसरीकडे आठवडाभर आधीच मान्सूनचा शिडकावा!!
- अकबरुद्दीन ओवैसी भाषण : हिंदुत्ववाद्यांच्या टोकाच्या भांडणाला आलेली विषारी फळे!!
- भारतीय रेल्वे घेणार आई – बाळाची काळजी; गाडीत लोअर बर्थला जोडला बेबी बर्थ!!