• Download App
    दोघा स्वीय सहाय्यकांना अटक केल्याने अनिल देशमुख यांची तंतरली, कोणत्या मुद्यावर चौकशी करणार विचारत ईडीच्या समन्सनंतरही हजर राहण्यास नकार Anil Deshmukh in danger due to gets arrest of two PAs, refuses to appear even after ED summons

    दोघा स्वीय सहाय्यकांना अटक केल्याने अनिल देशमुख यांची तंतरली, कोणत्या मुद्यावर चौकशी करणार विचारत ईडीच्या समन्सनंतरही हजर राहण्यास नकार

    दोघाही स्वीय सहाय्यकांना अटक केल्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांगलीच तंतरली आहे. सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) चौकशीसाठी समन्स धाडूनही कोणत्या मुद्यावर चौकशी करणार हे स्पष्ट नसल्याने त्यांनी ईडीकडे हजर होणे टाळले आहे. Anil Deshmukh in danger due to gets arrest of two PAs, refuses to appear even after ED summons


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दोघाही स्वीय सहाय्यकांना अटक केल्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांगलीच तंतरली आहे. सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) चौकशीसाठी समन्स धाडूनही कोणत्या मुद्यावर चौकशी करणार हे स्पष्ट नसल्याने त्यांनी ईडीकडे हजर होणे टाळले आहे.

    अनिल देशमुख यांना आज सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याचं त्यांचे वकील अ‍ॅड. जयवंत पाटील यांनी स्पष्ट केले. ईडीकडून अनिल देशमुख यांना पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही. नेमकं कोणत्या मुद्द्यावर चौकशी केली जाणार आहे याची माहिती कळवली जावी याबाबतचा अर्ज ईडीच्या कार्यालयात दाखल केला आहे, अशी माहिती अ‍ॅड. जयवंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आज अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत.

    ेईडीकडून शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. यात जवळपास ९ तासांहून अधिक काळ चौकशी झाली. त्यानंतर रात्री उशिरा अनिल देशमुख यांचे स्वीयसहाय्यक आणि खासगी सचिवांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनाही ईडीकडून चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स धाडण्यात आले होते.



    शनिवारी अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही कालच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होते.
    काळा पैसा आणि १०० कोटींच्या वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यापूवीर्ही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते.

    अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकास(पीए) ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलंआहे. वाझे वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना आज ईडीने अटक केली. मला खात्री आहे पुढील काही दिवसांत अनिल देशमुख यांना अटक होईल,असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

    Anil Deshmukh in danger due to gets arrest of two PAs, refuses to appear even after ED summons

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!