• Download App
    सिल्वर ओक एसटी आंदोलनाच्या गोंधळात अनिल देशमुख सीबीआय कोठडीच्या बातम्या मीडियातून "गायब"!!; "मास्टर माईंड" अजून शोधायचा!! Anil Deshmukh CBI in the confusion of Silver Oak ST movement

    Anil Deshmukh CBI : सिल्वर ओक एसटी आंदोलनाच्या गोंधळात अनिल देशमुख सीबीआय कोठडीच्या बातम्या मीडियातून “गायब”!!; “मास्टर माईंड” अजून शोधायचा!!

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पल फेक करण्यात आली. या आंदोलनाचा नेमका “मास्टरमाईंड” कोण याचा शोध घ्यावा, अशा मागण्या मुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पण एक सूरात केल्या आहेत.Anil Deshmukh CBI in the confusion of Silver Oak ST movement

    पण एसटी आंदोलनाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या बातम्या प्रसार माध्यमातून सध्या गायब झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे 400 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्याचबरोबर त्यांचे सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे तसेच सचिन वाझे हे देखील सीबीआयच्या ताब्यात आहेत या चौघांनी नेमके काय स्टेटमेंट दिलीत? त्या स्टेटमेंट मध्ये तपशील काय आहेत? सीबीआयचा तपास कुठपर्यंत गेला आहे? या संदर्भातल्या बातम्या सध्या मराठी माध्यमांमधून मधून “गायब” झाल्या आहेत…!!



    मराठी प्रसार माध्यमांनी सगळे लक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर झालेल्या दगडफेक आणि चप्पल फेकी वर कॉन्सन्ट्रेट केले आहे. मराठी माध्यमांमध्ये अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीच्या बातम्या तसेच सीबीआयच्या चौकशी आणि तपास याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिलेल्या नाहीत.

    – नवाब मलिक प्रयोग

    मध्यंतरी असाच प्रयोग नवाब मलिक यांच्या बाबतीत मराठी माध्यमांनी केला होता. अचानक दोन-तीन दिवस नवाब मलिक यांच्या कोठडीच्या बातम्या आणि ईडी तपासाच्या बातम्या मराठी माध्यमांनी “गायब” केल्या होत्या. त्याचेच रिपिटेशन सध्या अनिल देशमुख यांच्या बातम्यांच्या बाबतीत सुरू आहे.

    शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 20 – 25 मिनिटे भेट घेतली होती. त्यावर तर्कवितर्क लढवले जात असतानाच त्यांनी आपण लक्ष देण्याच्या लक्षदीप मुद्द्यावर तसेच संजय राऊत यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांचे लक्ष वेधले, असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. परंतु अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात गेले आहेत. त्यांचे नेमके स्टेटमेंट काय येते? सीबीआय तपास कुठपर्यंत पुढे जातो? आणि तो कुठली पाळेमुळे शोधून काढतो? यावर पवार पंतप्रधानांना भेटले होते, असे तर्क लावले गेले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक वर दगडफेक आणि चप्पल फेक करण्यात आली. त्याचा संबंधी एसटी आंदोलनाची जोडण्यात आला.

    मात्र या सर्व बातम्या प्रसार माध्यमांमध्ये येत असताना अनिल देशमुख, संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे हे सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांचा तपास आणि चौकशी सुरू आहे. त्यांची नेमकी स्टेटमेंट काय आहेत?, याच्या बातम्या मात्र मराठी माध्यमांमधून “गायब” आहेत. सिल्वर ओक वरील आंदोलनाचा “मास्टर माईंडचा” शोध अद्याप लागायचा आहे…!!

    Anil Deshmukh CBI in the confusion of Silver Oak ST movement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस