• Download App
    Anil Deshmukh CBI : सीबीआयने घेतला अनिल देशमुखांचा ताबा!! । Anil Deshmukh CBI: CBI takes possession of Anil Deshmukh !!

    Anil Deshmukh CBI : सीबीआयने घेतला अनिल देशमुखांचा ताबा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 100 कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. 1000 कोटींच्या वसुली प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यासाठी जयश्री पाटील यांनी अर्ज केला होता. त्यावर कोर्टाच्या परवानगीने सीबीआयने अनिल देशमुख यांचा ताबा घेतला आहे. Anil Deshmukh CBI: CBI takes possession of Anil Deshmukh !!

    जयश्री पाटील यांनी सीबीआयला तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयने तपास सुरू केला असता, या प्रकरणात पहिली अटक सीबीआयने केली होती. आता या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयने घेतला आहे. आर्थर रोड कारागृहातून हा ताबा घेण्यात आला आहे. त्यांना बुधवारी सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी अनिल देशमुख हे तुरुंगात पडले आहे त्यांचा खांदा दुखावला गेला होता त्यामुळे त्यांचे सीबीआयच्या ताब्यात जाणे लांबणीवर पडले होते.



    काय आहे प्रकरण

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

    वाझे, पलांडे, शिंदे सीबीआयच्या ताब्यात

    यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली . हीच तिघेही सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत.

    Anil Deshmukh CBI : CBI takes possession of Anil Deshmukh !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस