वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार चालक यांच्याकडून 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे मुद्दामून तब्येतीच्या कारणावरून सीबीआय चौकशी टाळतात, असा गंभीर आरोप सीबीआयच्या वकिलांनी सीबीआय स्पेशल कोर्टात केला आहे. Anil Deshmukh CBI: Anil Deshmukh avoids CBI probe on health grounds; CBI charges in special court
अनिल देशमुख यांची तब्बल 400 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सीबीआयला चौकशी करायची आहे. या प्रकरणात आधीच अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देखील ताब्यात घेतले आहे. परंतु अनिल देशमुख मात्र खराब तब्येतीचे कारण पुढे करून मुद्दामून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतात आणि सीबीआय अधिकाऱ्यांचे गंभीर प्रश्न टाळत राहतात. या प्रकारातून त्यांना सीबीआयची चौकशी टाळायची आहे, असा गंभीर आरोप सीबीआयच्या वकिलांनी स्पेशल कोर्टात केला आहे.
अनिल देशमुख, संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन माझे या चौघांनाही सीबीआय ताब्यात घेऊन आपल्या दिल्ली कार्यालयात नेऊन चौकशी आणि तपास करू इच्छित आहे. परंतु सीबीआय स्पेशल कोर्टाने मुंबईतच तुम्ही त्यांची सीबीआय चौकशी करू शकता, असे निरीक्षण नोंदवत त्यांना दिल्लीला नेण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे.
देशमुखांच्या हेतूंविषय सीबीआयला शंका
मात्र या सर्व प्रकारात अनिल देशमुख चौकशी कशी टाळतात हे मात्र स्पेशल कोर्टात उघड झाले आहे. अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत आणि ते तुरुंगात चालताना खांद्यावर पडल्यामुळे त्यांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. त्यांच्या खांद्यावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, अशा बातम्या आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीबीआय सीबीआयने उघडपणे स्पेशल कोर्टात अनिल देशमुख यांच्या हेतूंविषयी शंका घेतली आहे त्याचबरोबर तब्येतीचे खोटे कारण पुढे करून ते चौकशी टाळत असल्याचा गंभीर आरोप सीबीआयने कोर्टात केला आहे. त्यामुळे या आरोपाला आता महत्त्व आले आहे. अनिल देशमुख यांच्या बाबत कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Anil Deshmukh CBI: Anil Deshmukh avoids CBI probe on health grounds; CBI charges in special court
महत्त्वाच्या बातम्या
मुर्तझा अब्बासी झाकीर नाईकचा फॉलोअर; गोरखनाथ मंदिर हल्ला प्रकरणातील आरोपी