विशेष प्रतिनिधी
काटोल : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनिल देशमुख हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर काटोलच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते. काटोल येथील तीनखेडा-भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला. याचा फायदा घेत काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि दगड थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला.
हा हल्ला नेमका कुणी केला? आणि हल्ल्यामागचे कारण काय? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट – भाजप नेते अविनाश ठाकरे
अनिल देशमुख यांचा मुलगा व काटोलचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सलील देशमुख यांचा पराभव समोर दिसायला लागल्याने अनिल देशमुख यांनी केलेला हा निवडणूक स्टंट असल्याची टीका काटोल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी व भाजपा नेते अविनाश ठाकरे यांनी केली आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांकडून गाडीवर हल्ला करून घेतला. प्रकृती गंभीर असताना त्यांनी एकतर नागपूर वा मुंबईला जायला पाहिजे. पण, पराभव पचवू शकत नसल्याने त्यांनी स्टंटबाजी केली, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था चिंतेची – सुप्रिया सुळे
अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. एका माजी गृहमंत्र्यावर हल्ला होतोय हे दुर्दैवी आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून तो चिंतेचा विषय झाला आहे. अनिल देशमुखच नव्हे तर राज्यात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होऊ नये, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Anil Deshmukh car attacked
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar मी शरद पवार साहेबांना सोडले नाही; निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवारांचे मोठे विधान
- Baramati textile park मालवाहतुकीचे गेट ते परप्रांतीय सुरक्षा रक्षक; बारामती टेक्स्टाईल पार्कच्या “प्रतिभाताई एन्ट्रीत” वेगळाच ट्विस्ट!!
- Maitai : मैतई समुदायातील सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर