वृत्तसंस्था
मुंबई : अमृता फडणवीस ब्लँकमेलिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनिक्षा जयसिंघानी, बुकी अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी यांना पोलिसांनी सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने अनिक्षा हिला २४ मार्च पर्यंत, तर तिचे वडील अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी या दोघांना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Aniksha 24, Anil, Nirmala Jaisinghania in police custody till March 27
या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना मुख्य सरकारी वकील जयसिंह देसाई यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना पोलिसांच्या तपासांत प्रगती आहे, आरोपींविरोधात अधिकचे पुरावे सापडले आहेत, पोलीस कोठडीत अनिक्षाने तपासांत सहकार्य केले नाही, विचारलेल्या प्रश्नांची तिने उत्तरे दिली नाहीत, आरोपीचे सीडीआर तपासण्यात आले आहेत. डोंगलच्या माध्यमातून इंटरनेट आणि व्हॉट्सअॅप कॉलवर ती सतत मुख्य आरोपीच्या संपर्कात होती, त्याचा ठावठिकाणा तिला माहिती होता, याप्रकरणी तिच्या वडिलांसह आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या मोबाईलमधील डेटा मिळवण्याचे काम सुरू आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी अनिक्षा जयसिंघानीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली.
यावेळी आरोपींच्या वकिलाने अनिक्षाला 19 तारखेच्या संध्याकाळी अटक होऊनही तिला उशिरा न्यायालयात हजर केल्याचे न्यायालयात सांगितले. त्यावेळी सरकारी वकिलांनी हा आरोप फेटाळला. गुजरातहून आरोपींना केवळ ताब्यात घेतले होते. त्याची रिसतर स्थानिक पोलिसांना माहिती देऊन प्रक्रिया पूर्ण केली होती. अनिक्षाला इथे आणले, ओळख पटवली आणि मगच कायदेशीर अटक करण्यात आली. अनिल जयसिघांनी आणि निर्मल जयसिंघानीला 20 मार्चच्या मध्यरात्री 2 वाजता ताब्यात घेतले त्यानंतर काल संध्याकाळी मुंबईत आणल्यावर 5.00 वाजता अटक दाखवली.
– अनिल जयसिंघानियाला सुरक्षा
या दोघांकरता सरकारी वकिलांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपी अनिल जयसिंघानीला तब्बल 25 वर्षे राज्य सरकारने सुरक्षा पुरवली आहे. साल 1984 पासून त्याने त्याच्याकडची गोपनीय माहिती तपासयंत्रणेला पुरवली. ज्याचा इतर प्रकरणांत पोलीसांना फायदाच झाला. अमृता फडणवीस यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. 10 कोटींची खंडणी मागितल्याचे मोबाईल संदेश आढळले. मात्र ज्या मोबाईलमधून हे मेसेज पाठवलेत तो अद्याप हस्तगत झालेला नाही. तो मिळवणे गरजेचे आहे, त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर त्यानंतर न्यायालयाने अनिक्षा हिला २४ मार्च पर्यंत तर तिचे वडील अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी या दोघांना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Aniksha 24, Anil, Nirmala Jaisinghania in police custody till March 27
महत्वाच्या बातम्या
- सीबीआयप्रकरणी सिसोदिया यांच्या जामिनावर आज सुनावणी : काल कोर्टाने मद्य धोरण प्रकरणात दिली 14 दिवसांची कोठडी
- ‘’विरोधी एकजूट म्हणजे दिखाऊपणा असून केवळ….’’ एकजुटीसाठी धडपडणाऱ्या विरोधकांना प्रशांत किशोर यांनी सुनावलं!
- राहुल गांधी लोकसभेत देणार लंडनच्या भाषणावर खुलासा, संसदेत बोलण्याची परवानगी मागितली, अध्यक्षांना पत्र
- फ्रान्समध्ये निवृत्तीचे वय वाढविण्याचा कायदा लागू : मॅक्रॉन सरकारने दोन्ही अविश्वास मते जिंकली; लोकांचा विरोध सुरूच