विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशभरात विविध विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये काल झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतदानात सर्वाधिक कमी प्रतिसाद मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांनी दिला आहे. इथे फक्त 31.32% मतदान झाले आहे. Andheri’s response was short, almost empty of happiness
जी विधानसभेची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अतिशय हिरीरीने प्रचार करून शिंदे फडणवीस सरकारच्या उमेदवाराचा पराभव करून जिंकून येण्याची स्वप्न बघत होता, तिथे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके जिंकल्या तरी शिंदे फडणवीस सरकारच्या युतीच्या उमेदवाराचा पराभव केल्याचा आनंद त्यांना मिळणार नाही. किंबहुना अंधेरी पूर्व च्या मतदारांनी दिलेला प्रतिसाद पाहता आनंदाचा निरास करणारीच ही निवडणूक ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेल्या फुटीनंतर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपल्या गटाचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन करून घेण्याची संधी शिवसेनेच्या ठाकरे गटाला होती. त्याची जोरदार तयारी देखील ठाकरे गटाने केली होती. पण मध्येच निवडणूक बिनविरोध करण्याची टूम निघाली. शिंदे फडणवीस युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आणि अंधेरी पोटनिवडणुकीची खऱ्या अर्थाने राजकीय हवाच संपली.
पण ही हवा एवढी संपेल की एकूण मतदानाला जनता प्रतिसादच देणार नाही आणि मतदान 30 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल असे मात्र अपेक्षित नव्हते. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय साजरा झाला तरी शिंदे फडणवीस गटावर शिंदे फडणवीस युतीवर मात करण्याचा आनंद मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळणार नाही आणि हाच तो आनंदाचा निरास आहे.
Andheri’s response was short, almost empty of happiness
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : 32000 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर आणि येमेन – सीरियात दहशतवादी गुलाम म्हणून विक्री!!
- मोदी सरकारची महाराष्ट्राला भेट : 2 लाख कोटींच्या 225 प्रकल्पांना मंजूरी; रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांची घोषणा
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा